Monday, February 10, 2025
Homeब्रेकिंग न्यूज'बाळासाहेबांचे विचार जपले म्हणून विजयी झालो'

‘बाळासाहेबांचे विचार जपले म्हणून विजयी झालो’

मुंबई : विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळाला. कारण बाळासाहेबांच्या प्रेरणेने घडलेले आपण शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांचा विचार आपण जिवापाड जपला. तो विचार आपण कधीच सोडला नाही. त्यामुळे दणदणीत विजय आपल्याला मिळाला. याच विजयाचा विजयोत्सव साजरा करत आहोत; असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ते बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त आयोजिलेल्या शिवोत्सवात शिवसैनिकांना मार्गदर्शन करत होते.

शिवोत्सवाची सुरुवात उद्धव ठाकरे यांच्यावर व्हिडीओच्या माध्यमातून टीका करत झाली. यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून केलेल्या कामांची माहिती देणारा व्हिडीओ दाखवण्यात आला. एकनाथ शिंदे यांचा लाडक्या बहि‍णींनी सत्कार केला. यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले.

अडीच वर्षापूर्वी केलेला उठाव आणि त्यानंतरच्या ऐतिहासिक विजयाची जगभरात चर्चा झाली आहे. अनेक पिढ्या या विजयाची नोंद ठेवल्याशिवाय राहणार नाही. हे यश बाळासाहेबांच्या विचाराचे आणि महायुतीच्या एकजुटीचे आहे. अडीच वर्ष रात्रंदिवस केलेल्या कष्टाचं, मेहनतीचं, लाडक्या बहिणींचं, भावांचं, ज्येष्ठांचं, तरुणांचं आणि शेतकऱ्यांचे हे यश आहे. दोन अडीच वर्षात पायाला भिंगरी लावून आपण काम केले आहे. एकही क्षण आपण वाया घालवला नाही. म्हणूनच आपल्याला विजय मिळाला. विकास कामं चौपटीने केली. लोकाभिमुख योजना आणल्या आणि विकास केला. यामुळेच राज्यातील जनतेने आपल्यावर विश्वास दाखवला. म्हणूनच मी जनतेसमोर नतमस्तक होतो. त्यांनाही वंदन करतो, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

विधानसभा निवडणुकीत मिळालेला विजय हे बाळासाहेब ठाकरे यांना शिवसैनिकांनी दिलेले गिफ्ट आहे. बाळासाहेब असते तर आज त्यांनी आपल्याला शाबासकी दिली असती. आपली पाठ थोपटली असती. आज लाडक्या बहिणींनी माझा सत्कार केला आहे. हा घरच्यांनी केलेला कौतुक सोहळा आहे. कितीही आपण झेंडे गाडून आलो असलो तरी घरी आल्यावर आई उंबरठ्यावर आपल्यावरून भाकरी तुकडा ओवाळून टाकते तेव्हा जसा आनंद वाटतो, तसा आनंद माझ्या मनाला झाला आहे. तुम्ही सर्वांनी विश्वास दाखवला, साथ दिली त्यामुळेच सामान्य शेतकऱ्याचा मुलगा राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकला, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

शिवोत्सवात आमदार निलेश राणेंचा विशेष सत्कार

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त मुंबईत शिवसैनिकांनी शिवोत्सवाचे आयोजन केले होते. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेना आमदार निलेश राणे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -