आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशमधील नारायण महाविद्यालयात प्रथम वर्षाला शिकत असलेल्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. विद्यार्थ्याने महाविद्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. सीसीटीव्ही फूटेजमध्ये विद्यार्थी शांतपणे वर्गातून बाहेर येताना आणि तिसऱ्या मजल्याच्या बाल्कनीतून उडी मारताना दिसत आहे. ही धक्कादायक घटना महाविद्यालयात सकाळच्या सत्रात घडली.
विद्यार्थ्याने तिसऱ्या मजल्याच्या बाल्कनीच्या कठड्यावर उभे राहून थेट खाली उडी मारली. वर्ग सुरू असताना विद्यार्थी शांतपणे वर्गातून बाहेर आला. त्याने कोणाला लक्षात येण्याआधीच आत्महत्या केली. वर्गात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात विद्यार्थ्याच्या हालचाली रेकॉर्ड झाल्या आहेत. यात विद्यार्थी वर्गातून बाहेर येताना स्पष्ट दिसत आहे.
महाविद्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारल्यामुळे विद्यार्थी जमिनीवर आदळला तेव्हा मोठा आवाज झाला. हा आवाज ऐकून अनेकजण बाल्कनीत आले. यात विद्यार्थी ज्या वर्गात होता त्या वर्गातले विद्यार्थी पण होते. विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलण्यामागचे कारण अद्याप कोणालाही कळलेले नाही. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. महाविद्यालयाच्या प्रशासनाने तिसऱ्या मजल्यावरुन उडी टाकणाऱ्या आणि गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याला तातडीने रुग्णालयात नेले. पण तोपर्यंत वेळ टळून गेली होती. विद्यार्थ्याने थोड्याच वेळात अखेरचा श्वास घेतल. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजलेले नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या करणारा विद्यार्थी इंटरमीजिएटच्या प्रथम वर्षाला होता. तो श्री सत्यसाई जिल्ह्यातील बट्टेनपल्ली मंडळातल्या रामपुरम गावाचा रहिवासी होता.
मानसिक तणावाखाली असलेल्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याआधी 022-25521111 वर सोमवार ते शनिवार सकाळी आठ ते रत्री दहा या वेळेते संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस आणि प्रशासनाने केले आहे. अथवा 9999666555 किंवा help@vandrevalafoundation.com वर वंद्रेवाला फाउंडेशन फॉर मेंटल हेल्थ येथे संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्सची टक्कर गुजरात टायटन्सशी होत आहे. हा…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…