रोज एक फूटणार, उद्या रत्नागिरीत पहिला पक्ष प्रवेश; हिंमत असेल तर पक्ष प्रवेश रोखून दाखवा

उद्योगमंत्री उदय सामंत यांचे आव्हान


काँग्रेसच्या ५ आमदारांसह उबाठाचे ४ आमदार, ३ खासदार, १० माजी आमदार शिंदे गटात प्रवेश करणार

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे ४ आमदार, ३ खासदार, १० माजी आमदार आणि काँग्रेसचे ५ आमदार लवकरच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करतील, असा दावा शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते. याचा पहिला टप्पा उद्या पार पडणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.


सामंत म्हणाले की, मला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलग तीन वेळा दावोसला जाण्याची संधी दिली. त्याचाच भाग म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात एवढी मोठी गुंतवणूक येत आहे.


मी दोन दिवसांपूर्वी सांगितले होते की, काही नेते बालिश झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आता न बोलले बरं, मी त्यांच्याबाबत नंतर सविस्तर बोलणार आहे. ज्यांचा राजकीय अस्त झाला आहे ते आता त्यांचा राजकीय ‘उदय’ करण्यासाठी माझ्या नावाचा उपयोग करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे हा माझा मोठेपणा आहे. पण अशा कोणत्याही बालिश विधानामुळे माझ्यात आणि एकनाथ शिंदे यांच्यात दरी निर्माण होणार नाही.



मी आधीही सांगितले होते की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात उद्यापासून ठाकरे गटाला खिंडार पडण्यास सुरुवात होईल. याचा पहिला ट्रेलर उद्या (२४ जानेवारी) तुम्हाला पाहायला मिळेल. ठाकरे गटाचे ४ आमदार, ३ खासदार, काँग्रेसचे ५ आमदार आणि ठाकरे गटाचे १० माजी आमदार व असंख्य जिल्हाप्रमुख हे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेमध्ये सामील होतील. याचा पहिला टप्पा म्हणून उद्या रत्नागिरीत पहिला पक्ष प्रवेश होणार आहे, असेही सामंत म्हणाले.


रत्नागिरीतील काही माजी आमदार हे ठाकरे गटाला सोडून शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार आहेत. त्यानंतर मी कोल्हापूरमार्गे सांगलीत जाणार आहे. पुढे सातारा आणि साताऱ्यानंतर पुणे असा पहिला टप्पा आहे. माझ्या नावाची बदनामी करणाऱ्यांना माझं आव्हान आहे की त्यांनी आमच्या पक्षात येणाऱ्यांचे पक्ष प्रवेश रोखून दाखवावे. आता तुम्हाला उद्यापासून ठाकरे गटातून दररोज एकजण फुटल्याची बातमी पाहायला मिळेल, असेही सामंत म्हणाले.

Comments
Add Comment

सायन प्रतीक्षा नगर येथील चार इमारती अतिधोकादायक घोषित

सायन प्रतीक्षानगर येथील म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबिरातील चार इमारती

मुंबईतील ३८८ म्हाडा पुनर्रचित इमारतींचा पुनर्विकास समूह पुनर्विकासाच्या माध्यमातून होणार

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांच्या

महापालिका शाळांमधील मुलांचे व्याकरण होणार अधिक मजबूत

इयत्ता पाचवी ते आठवीच्या मुलांना देणार व्याकरणाची पुस्तके मुंबई (खास प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांचे भाषेच्या

मुंबई–वाढवण प्रवासाला नवे पंख; कसा असेल वाढवण बंदराशी जोडणारा उन्नत पूल?

मुंबई : मुंबई ते वाढवण बंदरापर्यंतचा प्रवास आता अधिक वेगवान आणि सुलभ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दक्षिण

बिबट्याच्या दहशतीवर उपाययोजना करण्याची मागणी

मुंबई: ग्रामीण महाराष्ट्रातील बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना

पद्मभूषण सन्मानित धर्मेंद्र यांना शासकीय अंत्यसंस्कार नाहीत; खरे कारण समोर

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले असून, त्यांच्यावर मुंबईतील विलेपार्ले