मुंबई (मानसी खांबे) : पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या भायखळा येथील राणीच्या बागेत (Mumbai Rani Baug) देशासह परदेशी वाणाची (Foreign Tree) अनेक ऐतिहासिक झाडे थाटात उभी आहेत. या विविध प्रजातींच्या झाडांची माहिती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या झाडांवर रिल्स बनवण्याचा निर्णय राणी बागेतील प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे महाकाय, दुर्मिळ झाडांचा हा ठेवा आता पर्यटकांना घरबसल्या एका क्लिकवर पाहता येणार आहेत.
भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली असली तरी इंग्रजकालीन काही आठवणी आजही थाटात उभ्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे इंग्रजांनी लावलेली राणीच्या बागेतील (Mumbai Rani Baug) विदेशी झाडे होय. दूरदृष्टीचा विचार करून इंग्रजांनी लावलेली ही झाडे महाकाय असून मुंबईच्या पर्यावरणात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. सध्या राणीच्या बागेत ६ खंडांतील विविध प्रकारची झाडे आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलिया, अमेरिका, युरोप, आफ्रिका, आशिया या खंडांतील झाडांचा समावेश आहे. खाया, ऑस्ट्रेलियन चेस्टनट, चेंडूफुल, ब्राझिलियन आयनवूड, कडल ट्री, कैलासपती, चायनीज फॅन पाम, कोको ट्री, कॉलविल्स, ग्लोरी, कॉर्कस्क्रू फ्लॉवर, दिवी दिवी, कांडोळ – इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, भारत, गेस्ट ट्री, सफेदा, मॅजेस्टिक हेवन लोटस, लाल झुंबर – जमैका, व्हेनेझुएला अशा अनेक परदेशी वाणाच्या झाडांचे रोपण ब्रिटिशांनी भारतात केले होते. तब्बल १६२ वर्षांपासून राणीच्या बागेत असणारी ही झाडे आजही टवटवीत आहेत.
या झाडांसाठी कोणत्याही प्रकारची विशेष काळजी घ्यावी लागत नाही. वेळोवेळी पाणी आणि राणीच्या बागेत तयार होणारा पालापाचोळा, शेणखत व गांडूळ यांच्यापासून तयार होणारे खत या झाडांना घातले जाते. तसेच जुनी झाडे असल्यामुळे वाळवी लागली असल्यास त्यावर कीटकनाशके वापरली जातात. दरम्यान, पूर्वीपासूनच या झाडांचे संगोपन चांगले झाल्यामुळे आजही ही झाडे राणीच्या बागेत थाटात उभी असल्याचे जीवशास्त्रज्ञ व शिक्षण नि जनसंपर्क अधिकारी डॉ. अभिषेक साटम यांनी संगितले.
राणीच्या बागेत लागवड केलेली सर्व देशी आणि विदेशी झाडांची माहिती लोकापर्यंत पोहोचवण्यासाठी राणीबाग प्रशासनाने रील्स व्हिडिओ तयार करण्याची योजना आखली आहे. याचे नाव ‘हरितसंपदेविषयी माहिती देणारे कलरफुल सीरिज’ असून यामध्ये बागेतील सर्व प्रकारच्या झाडांचा बहरण्याचा काळ दाखवणार आहोत. तसेच राणीच्या बागेत हे झाड कोणत्या ठिकाणी आहे म्हणजेच त्याचे लोकेशन देखील देण्यात येणार आहे. सध्या यावर काम सुरू असून लवकरच हे व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत. दरमहा ४ ते ५ व्हिडिओ पोस्ट करण्याचा राणी बाग प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे डॉ. अभिषेक साटम यांनी सांगितले.
राणीच्या बागेत ब्रिटिशांनी लावलेले एका अवाढव्य स्वरूपातील अमेरिकन झाड आजही तोऱ्यात उभे आहे. जलद गतीने वाढणारे, इतर छोट्या झाडांना सावली देणारे आणि भलेमोठे खोड असणारे हे वृक्ष आहे. मोठ्या छत्रीसारखा शाखाविस्तार असलेल्या या वृक्षाच्या पानांवर अनेक कीटकनाशके असून एकत्रित विष्ठाविसर्जनामुळे या झाडाखाली कित्येकदा पाण्याचे थेंब पडल्याचा भास होतो. त्यामुळे या झाडाला रेन ट्री नाव दिले आहे. या झाडाला ‘बेस्ट ट्री ऑफ मुंबई’ हा पुरस्कार देखील मिळाला आहे.
भारतीय बागायतदारांना स्वावलंबी बनविण्याचा उद्देशाने १८४२ साली अग्रिकल्चरल अँड होरटीकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडियाच्या सभासदांनी शिवडीमध्ये वनस्पती बाग उभारली. मात्र ही जागा मुख्य शहरापासून दूर असल्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या लोकांची संख्या घटत होती. त्यामुळे परदेशी वाणांची झाडे लोकांच्या निदर्शनास येण्यासाठी ही झाडे राणीच्या बागेत स्थलांतरित करण्यात आली. (Mumbai Rani Baug)
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…