Tuesday, February 11, 2025
Homeताज्या घडामोडीतुर्कीच्या स्की रेसॉर्टमध्ये लागली आग, ६६ जणांचा मृत्यू

तुर्कीच्या स्की रेसॉर्टमध्ये लागली आग, ६६ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली: तुर्कीच्या बोलू पहाडो येथू ग्रँड कार्टल हॉटेलमध्ये मंगळवारी लागलेल्या भीषण आगीत ६६ जणांचा मृत्यू झाला तर ५०हून अधिक जण जखमी झाले. सोबतच आगीने घाबरलेल्या पाहुण्यांनी जीव वाचवण्यासाठी हॉटेलच्या खिडकीतून उड्या मारल्या. ही घटना उत्तर-पश्चिम तुर्की स्थित एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ कार्टालकाया स्की रिसॉर्टमध्ये घडली. आगीची घटना घडली तेव्हा हॉटेलमध्ये २३४ पाहुणे होते.

वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार तुर्कीच्या बोलू पहाडोमध्ये ग्रँड कार्टल हॉटेलात मंगळवारी भीषण आग लागल्याने ६६ जणांचा मृ्त्यू झाला. ही घटना उत्तर पश्चिम तुर्कीमधील लोकप्रिय कार्तलकाया स्की रिसॉर्टमध्ये घडली. यावेळेस तेथे २३४ पाहुणे थांबले होते.

सकाळी साडेतीन वाजण्याच्या सुमारास लागली आग

१२व्या मजल्यावर हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये सकाळी साडेतीन वाजण्याच्या सुमारास आग लागली. ही आग वेगाने बिल्डिंगमध्ये पसरली. हॉटेलमध्ये सगळीकडे धूरच धूर झाल्याने एकच गोंधळ उडाला.

दुर्घटनेत ५१ जण जखमी

आरोग्य मंत्री केमल मेमिसोग्लू यांनी या दुर्घटनेत ५१ जण जखमी झाल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. यात एका व्यक्तीची स्थिती गंभीर आहे. दरम्यान, या घटनेप्रकरणी मंत्र्‍यांनी शोक व्यक्त केला आहे.

उडी मारल्याने दोन जणांचा मृत्यू

बोलूचे गर्व्हनर अब्दुल अजीज अदीन यांच्यानुसार, या दुर्घटनेत दोन जणांनी घाबरून बिल्डिंगमधून उडी मारल्याने मृत्यू झाला. काही जणांनी घाबरून हॉटेलमधून उड्या मारल्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -