Saturday, May 10, 2025

महाराष्ट्रब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

Guillain Barre Syndrome : पुण्यात जीबीएस रुग्णांच्या संख्येत वाढ; रुग्णांचा आकडा ५९ वर!

Guillain Barre Syndrome : पुण्यात जीबीएस रुग्णांच्या संख्येत वाढ; रुग्णांचा आकडा ५९ वर!

पुणे : पुणे शहरात 'गुलेन बॅरी सिंड्रोम' (Guillain Barre Syndrome) या आजाराने थैमान घातले आहे. मागील दोन दिवसात या आजाराचे ५९ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पुणेकरांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.



पुणे शहरातील किरकिटवाडी, सिंहगड रस्ता आणि धायरी परिसरात गुलेन बॅरी सिंड्रोम या आजाराचे सर्वाधिक रुग्ण आहेत. यामुळे पुणे पालिका अलर्ट मोडवर आली असून या परिसरातले पाण्याचे नमुने महापालिकेकडून तपासले जात आहेत.



गुलेन बॅरी सिंड्रोमची लक्षणे कोणती?


स्नायू कमकुवत होणे, संवेदनशीलता कमी होणे तसेच डोळ्यांच्या स्नायू आणि दृष्टीमध्ये देखील समस्या असू शकतात.

Comments
Add Comment