मुंबई : काही महिन्यांपासून अभिनेता सलमान खानला (Salman Khan) सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्यानंतर नुकतेच सैफ अली खानवर चाकू हल्ला झाल्याची घटना घडली आहे. अशातच आता बॉलीवूडमधले चार दिग्गज कलाकारांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे बॉलिवूड चित्रपटसृष्टीवर संकट आल्याचे दिसून येत आहे.
Nitesh Rane : मुंब्राचे जीतुद्दीन आणि बारामतीच्या ताईंना फक्त खान कलाकारांची काळजी!
कॉमेडियन कपिल शर्माला (Kapil Sharma), अभिनेता राजपाल यादव (Rajpal Yadav), कोरिओग्राफर रेमो डिसुझा (Remo Dsouza) आणि सुगंधा मिश्रा यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. कपिलसह त्याच्या कुटुंबालाही मारण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
धमकीचा पाकिस्तानशी कनेक्शन
कपिल शर्मा, राजपाल यादव, रेमो डिसूझा आणि सुंगधा मिश्रा या कलाकारांना ई-मेलद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. हा ई-मेल पाकिस्तानमधून पाठवण्यात आला असल्याचा अंदाज दिला जात आहे. यामध्ये ‘BISHNU’ असे लिहिण्यात आले आहे. तसेच ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीला जर ८ तासात प्रतिसाद मिळाला नाही तर, कारवाई करणार असे लिहले आहे. (Bollywood Death Threats)