राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान २ फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी खुले

नवी दिल्ली: राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान २ फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात येणार आहे. वसंत ऋतूमध्ये हे उद्यान सर्वसामान्यांसाठी खुले केले जाते.


एकूण १५ एकरांवर पसरलेल्या या प्रसिद्ध उद्यानात ८५ हून अधिक प्रजातींची फुले आहेत. यात १०० हुन अधिक प्रकारचे गुलाब आणि ५ हजार हंगामी फुलांच्या ७० विविध प्रजाती आहेत. विविध प्रकारच्या ट्यूलिपसह जगभरातील रंगीबेरंगी फुलांची झाडे आहेत. फुलांव्यतिरिक्त १६० जातींची ५ हजार झाडे अमृत उद्यानात आहेत, यातील काही काही झाडे अनेक दशके जुनी आहेत.


राष्ट्रपती भवनात ६ ते ९ मार्च दरम्यान 'विविधता का अमृत महोत्सव'आयोजित केला जाणार आहे. या वर्षी अमृत महोत्सवात दक्षिण भारतातील समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि वैशिष्ट्यपूर्ण परंपरांचे दर्शन घडवले जाणार आहे. दरवर्षी देशभरातील ५ ते ६ लाख लोक अमृत उद्यानाला भेट देत असतात. त्यानुसार अमृत उद्यान २ फेब्रुवारी ते ३० मार्च २०२५ या कालावधीत जनतेसाठी खुले राहणार आहे. सोमवार वगळता आठवड्यातील सर्व दिवस सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत लोक उद्यानाला भेट देऊ शकतात. मात्र उद्यान ५ फेब्रुवारीला दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानामुळे, 20 आणि 21 फेब्रुवारीला राष्ट्रपती भवनात आयोजित एका परिषदेमुळे आणि 14 मार्च रोजी होळीच्या निमित्ताने बंद राहील.


अमृत उद्यानाला भेट देण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने तिकीट निशुल्क आरक्षित करता येतील. अमृत उद्यानाला भेट देणाऱ्या सर्वांसाठी प्रवेश राष्ट्रपती भवनाच्या प्रवेशद्वार क्रमांक 35 मधून होईल. अभ्यागतांच्या सोयीसाठी सेंट्रल सेक्रेटरीएट मेट्रो स्टेशन ते प्रवेशद्वार क्रमांक 35 दरम्यान शटल बस सेवा दर 30 मिनिटांनी सकाळी 9.30 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत उपलब्ध असेल.राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यानाव्यतिरिक्त सर्वसामान्य लोक मंगळवार ते रविवार दरम्यान राष्ट्रपती भवनाची मुख्य इमारत आणि राष्ट्रपती भवन संग्रहालयाला देखील आधी तिकीट आरक्षित करून भेट देऊ शकतात. अमृत उद्यान 26 फेब्रुवारी रोजी दिव्यांग व्यक्तींसाठी, तर 27 फेब्रुवारी रोजी संरक्षण, निमलष्करी आणि पोलिस दलातील कर्मचाऱ्यांसाठी, 28 मार्च रोजी महिला आणि आदिवासी महिला बचत गटांसाठी आणि 29 मार्च रोजी ज्येष्ठ नागरिकांसाठी खुले असेल.

Comments
Add Comment

Weather Alert India : देशातील 12 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; नेमका कुठे आणि कसा पाऊस पडणार? जाणून घ्या

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे देशातील अनेक भागांत मान्सून सक्रिय झाला

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशला पुराचा तडाखा; पाच सैनिक वाहून गेले तर चार नागरिकांचा मृत्यू

नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे अरुणाचल प्रदेशला पावसाचा जबर तडाखा बसला आहे. दिबांग व्हॅली जिल्ह्यात अचानक

PM Modi Speech : एका वर्षात एक कोटी युवकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे कौशल्य प्रशिक्षण देण्याची पंतप्रधानांची घोषणा

नवी दिल्ली : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र

Narendra Modi : 'सेमीकंडक्टरपासून अणुऊर्जेपर्यंत...'; जाणून घ्या पंतप्रधान मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला

Independence Day 2026 : तिरंगा, २१ तोफांची सलामी आणि ‘वंदे मातरम्’चा निनाद; लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाचा दिमाखदार सोहळा

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील ऐतिहासिक लाल

Independence Day 2026 : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त Google Doodleची खास कलाकृती; भारतीय वस्त्रकलेतून दिसली सांस्कृतिक विविधता

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त Google ने आपल्या होमपेजवर खास आणि रंगीबेरंगी Doodle सादर करून