
मुंबई : विकी कौशल (Vicky Kaushal) आणि रश्मिका मंदानाचा (Rashmika Mandana) आगामी चित्रपट 'छावा' सध्या चांगलाच चर्चेत आहे. गेल्या काही महिन्यांपासून 'छावा'चं पोस्टर आणि टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. अशातच काल 'छावा'च्या कलाकारांचे फर्स्ट लूक समोर आले. त्यानंतर सर्व चाहत्यांची चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना आता छावा चित्रपटाचा भन्नाट ट्रेलर (Chhaava Trailer) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

ठाणे : मुंबई नाशिक महामार्गावरील कॅडबरी जंक्शन भागात बुधवारी दुपारी रासायनिक कंटेनर उलटल्याने अपघात झाला. या अपघातामुळे कॅडबरी जंक्शन भागात काहीकाळ ...
ट्रेलरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराजांचा उदय, राज्याभिषेक ते औरंगजेबाशी निडरपणे दिलेला लढा याची झलक पाहायला मिळते. दमदार संवाद, तितकच प्रभावी संगीत आणि विकीचा दमदार अभिनय लक्ष वेधून घेतोय. अक्षय खन्नाने औरंगजेबाच्या भूमिकेत विकीला कडवी टक्कर दिली आहे.
दरम्यान, विकी कौशलचा हा बहुप्रतिक्षित चित्रपट येत्या १४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं असून या चित्रपटात विकीसह दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंची भूमिका साकारणार आहे. याशिवाय संतोष जुवेकर, शुभंकर एकबोटे यांसारखे मराठी कलाकार चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. तर ‘छावा’मध्ये औरंगजेबची भूमिका अभिनेता अक्षय खन्ना साकारणार आहे. (Chhaava Trailer)
?si=Ly8KdV1Owxynslis