Sunday, February 9, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेMumbai Nashik Highway : मुंबई नाशिक महामार्गावर रासायनिक कंटेनर उलटला!

Mumbai Nashik Highway : मुंबई नाशिक महामार्गावर रासायनिक कंटेनर उलटला!

ठाणे : मुंबई नाशिक महामार्गावरील कॅडबरी जंक्शन भागात बुधवारी दुपारी रासायनिक कंटेनर उलटल्याने अपघात झाला. या अपघातामुळे कॅडबरी जंक्शन भागात काहीकाळ वाहतुक कोंडी झाली होती. वाहतूक कोंडीमुळे घोडबंदर, भिवंडी आणि नाशिकच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या चालकांचे हाल झाले. उरण जेएनपीटी येथून गुजरात आणि भिवंडीच्या दिशेने हजारो अवजड वाहनांची वाहतुक होते. ही वाहने घोडबंदर, भिवंडी येथील काल्हेर भागात जाण्यासाठी कॅडबरी जंक्शन येथील सिग्नल जवळील उड्डाणपुलाखालून वळण घेतात.

राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान २ फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी खुले

बुधवारी १७ टन वजनाच्या रासायनिक पदार्थांनी भरलेला कंटेनर गुजरात येथील दहेज या भागात वाहतुक करणार होते. कंटेनरमध्ये चालक भुपेंद्र कुमार आणि मदतनीस नीरज कुमार हे बसले होते. दुपारी १२.१५ वाजताच्या सुमारास कंटेनर कॅडबरी जंक्शन येथे आले असता, चालक भुपेंद्र याचे वाहनावरील निंयत्रण सुटले आणि कंटेनर उलटला. या अपघातामुळे कंटेनरमधील रासायनिक पदार्थ आणि तेल रस्त्यावर सांडले. घटनेची माहिती ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन कक्ष, घनकचरा विभाग आणि पोलिसांना मिळाल्यानंतर पथके घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी रस्त्यावर सांडलेल्या तेल आणि रासायनिक पदार्थांवर माती पसरविली. या अपघातामुळे मुंबई नाशिक महामार्गावरील कॅडबरी जंक्शन परिसरात वाहतुक कोंडी झाली होती. त्यामुळे घोडबंदर, भिवंडी आणि नाशिकच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या चालकांचे हाल झाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -