मुंबई : क्रिकेट विश्वातील बालपणीचे दोन खरे मित्र अशी ओळख असलेले मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि त्याचा लहानपणीचा सगळ्यात जवळचा मित्र म्हणजे भारतीय क्रिकेट संघातील माजी खेळाडू विनोद कांबळी. हे दोघेही कायम चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी विनोद आणि सचिन यांचा रमाकांत आचरेकर सरांच्या कार्यक्रमातील एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामध्येही सचिनने विनोद प्रती दाखवलेलं प्रेम सगळ्यांनाच दिसलं. त्यानंतर विनोद कांबळीच्या आजारपणाची बातमी कानावर आली. त्यातूनही विनोद आता पूर्णपणे बरा झाला असून त्याच्या आजारपणातही सचिनने मोलाची साथ दिली. आज सचिन जरी करिअरमध्ये अव्वल स्थानावर असला तरी विनोदनेही भारतासाठी मैदानावर एकेकाळी धुव्वा उडवला होता. आता याच विनोद कांबळीच्या प्रवासाची गोष्ट सांगणारा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान २ फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी खुले
काही वर्षांपूर्वी सचिनच्या आयुष्यावर सचिन अ बिलियन ड्रीम्स, या नावाचा सिनोमा आला होता. हा सिनेमा रवी भागचंदका यांच्या 200 Not Out या कंपनीने निर्मित केला होता. त्यानंतर आता रवी भागचंदका विनोद कांबळीच्या आयुष्यावर एक बॉलीवूड सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. विनोदच्या सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन हे अभिजित देशपांडे करणार आहेत. या चित्रपटातून विनोदच खरं आयुष्य प्रेक्षकांसमोर उलगडणारं आहे. दरम्यान या चित्रपटात विनोद काम करणार आहे का याबाबतची कोणतीही अधिकची माहिती समोर आलेली नाही. हा चित्रपट विनोदच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.