Monday, February 17, 2025
Homeताज्या घडामोडीJalgaon Train Accident : जळगावात रेल्वे दुर्घटना, १५ प्रवाशांचा मृत्यू

Jalgaon Train Accident : जळगावात रेल्वे दुर्घटना, १५ प्रवाशांचा मृत्यू

पुष्पक एक्स्प्रेसला आग लागल्याच्या भीतीने प्रवाशांनी मारल्या उड्या; समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्स्प्रेसने चिरडल्याने १५ जणांचा मृत्यू

जळगाव : मुंबईकडे जाणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसमध्ये (Pushpak Express) आग लागल्याच्या भीतीने काही प्रवाशांनी चालत्या गाडीतून उड्या मारल्या. मात्र, समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्स्प्रेसने (Bengaluru Express) त्यांना चिरडल्याने सहा ते आठ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना (Jalgaon Train Accident) जळगाव जिल्ह्यातील परांडा स्थानकाजवळ घडली आहे.

पुष्पक एक्स्प्रेस मुंबईकडे जात असताना अचानक ब्रेक लावल्यामुळे गाडीच्या चाकांमधून धूर आणि ठिणग्या उडाल्या. या दृश्यामुळे काही प्रवाशांना आग लागल्याची शंका वाटली. घाबरून त्यांनी गाडीतून उड्या मारण्यास सुरुवात केली.

Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांकडून ५ लाखांची मदत जाहीर

याच वेळी समोरून वेगाने येत असलेल्या बंगळुरू एक्स्प्रेसने या प्रवाशांना धडक दिली. या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

JDUने पाठिंबा काढला आता भाजपा भाकरी फिरवणार, मणिपूरचा मुख्यमंत्री बदलणार ?

घटनेचे प्रत्यक्षदर्शी बाबा जाधव यांनी सांगितले की, “परांडा स्थानकाच्या अगोदर पुष्पक एक्स्प्रेसचा ब्रेक लागल्याने घर्षण झाले आणि आगीच्या ठिणग्या उडाल्या. यामुळे गाडीत असलेल्या प्रवाशांमध्ये भीती पसरली. काहींनी घाबरुन गाडीतून उड्या मारल्या आणि दुर्दैवाने बंगळुरू एक्स्प्रेसने त्यांना चिरडले.”

घटनेची माहिती मिळताच मंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी आणि प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी घटनेची माहिती मिळताच दुःख व्यक्त केले.

ब्रेक लावल्यानंतर धूर आणि ठिणग्या

पुष्पक एक्स्प्रेसच्या चाकांमधून उडालेल्या ठिणग्यांमुळे आग लागल्याचा संशय काही प्रवाशांना झाला. घाबरलेल्या प्रवाशांनी चालत्या गाडीतून उड्या मारल्याने आणि त्याचवेळी समोरून आलेल्या गाडीची धडक बसल्याने हा अपघात घडला. बंगळुरू एक्स्प्रेसमुळे प्रवाशांना जोरदार धडक बसली, यात प्रवाशांचा मृत्यू झाला.

रेल्वे अधिकाऱ्यांनी या अपघाताची गंभीर दखल घेतली आहे. मृत्यू पावलेल्या प्रवाशांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. तसेच, या अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे.

ही दुर्घटना प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर प्रश्न उभे करत असून रेल्वे प्रशासनाने तत्काळ पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -