कोलकाता : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या T20 मालिकेतील पहिला सामना ईडन गार्डन स्टेडियम येथे होत आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेणे भारतासाठी फायद्याचे ठरले. इंग्लंडचा अर्धा संघ लवकर तंबूत परतला. वरुण चक्रवर्तीने तीन, अर्शदीप सिंह, हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेलने प्रत्येकी दोन बळी घेतले. जोस बटलर, हॅरी ब्रूक, जोफ्रा आर्चर आणि आदिल रशीद यांच्यामुळे इंग्लंडने २० षटकांत सर्वबाद १३२ धावा केल्या. भारतापुढे २० षटकांत १३३ धावांचे आव्हान आहे.
इंग्लंडचा सलामीवीर, यष्टीरक्षक फलंदाज फिलिप सॉल्ट शून्य धावा करुन अर्शदीपच्या चेंडूवर संजू सॅमसनकडे झेल देऊन परतला. थोड्याच वेळाने बेन डकेट चार धावा करुन अर्शदीपच्या चेंडूवर रिंकू सिंहकडे झेल देऊन परतला. हॅरी ब्रूक १७ धावा करुन वरुणच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. पाठोपाठ लियाम लिव्हिंगस्टोन शून्य धावा करुन त्रिफळाचीत झाला. तर जेकब बेथेल हार्दिक पांड्याच्या चेंडूवर सात धावा करुन अभिषेक शर्माकडे झेल देऊन परतला. यानंतर जेमी ओव्हरटन दोन धावा करुन अक्षरच्या चेंडूवर नितीश रेड्डीकडे झेल देऊन परतला. गुस ॲटकिन्सन दोन धावा करुन अक्षरच्या चेंडूवर बाद झाला. त्याला संजू सॅमसनने स्टंपिंग करुन बाद केले.
Jalgaon Train Accident : जळगावात रेल्वे दुर्घटना, ११ प्रवाशांचा मृत्यू
इंग्लंडची एकीकडे पडझड सुरू असताना अर्धशतक करुन एक बाजू ठामपणे लढवत असलेला कर्णधार जोस बटलर ६८ धावा करुन वरुमच्या चेंडूवर नितीश रेड्डीकडे झेल देऊन परतला. जोफ्रा आर्चर १२ धावा करुन हार्दिक पांड्याच्या चेंडूवर सूर्यकुमारकडे झेल देऊन परतला. आदिल रशीदने नाबाद आठ धावा केल्या. मार्क वूड एक धाव करुन धावचीत झाला. त्याला सॅमसनने धावचीत केले.
अर्शदीपचा विक्रम
अर्शदीप सिंह हा भारतासाठी आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने इंग्लंडच्या दोन फलंदाजांना बाद करत T20 क्रिकेटमध्ये ९७ बळी मिळवले.
अर्शदीप सिंह – ९७*
युजवेंद्र चहल – ९६
भुवनेश्वर कुमार – ९०
हार्दिक पांड्या – ८९
जसप्रीत बुमराह – ८९
भारत- अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, रिंकू सिंह, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती
इंग्लंड- बेन डकेट, फिलिप साल्ट (यष्टीरक्षक), जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, जेमी ओव्हरटन, गस अॅटकिन्सन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वूड