Saturday, February 8, 2025
Homeदेशराष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान २ फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी खुले

राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान २ फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी खुले

नवी दिल्ली: राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान २ फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात येणार आहे. वसंत ऋतूमध्ये हे उद्यान सर्वसामान्यांसाठी खुले केले जाते.

एकूण १५ एकरांवर पसरलेल्या या प्रसिद्ध उद्यानात ८५ हून अधिक प्रजातींची फुले आहेत. यात १०० हुन अधिक प्रकारचे गुलाब आणि ५ हजार हंगामी फुलांच्या ७० विविध प्रजाती आहेत. विविध प्रकारच्या ट्यूलिपसह जगभरातील रंगीबेरंगी फुलांची झाडे आहेत. फुलांव्यतिरिक्त १६० जातींची ५ हजार झाडे अमृत उद्यानात आहेत, यातील काही काही झाडे अनेक दशके जुनी आहेत.

राष्ट्रपती भवनात ६ ते ९ मार्च दरम्यान ‘विविधता का अमृत महोत्सव’आयोजित केला जाणार आहे. या वर्षी अमृत महोत्सवात दक्षिण भारतातील समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि वैशिष्ट्यपूर्ण परंपरांचे दर्शन घडवले जाणार आहे. दरवर्षी देशभरातील ५ ते ६ लाख लोक अमृत उद्यानाला भेट देत असतात. त्यानुसार अमृत उद्यान २ फेब्रुवारी ते ३० मार्च २०२५ या कालावधीत जनतेसाठी खुले राहणार आहे. सोमवार वगळता आठवड्यातील सर्व दिवस सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत लोक उद्यानाला भेट देऊ शकतात. मात्र उद्यान ५ फेब्रुवारीला दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानामुळे, 20 आणि 21 फेब्रुवारीला राष्ट्रपती भवनात आयोजित एका परिषदेमुळे आणि 14 मार्च रोजी होळीच्या निमित्ताने बंद राहील.

अमृत उद्यानाला भेट देण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने तिकीट निशुल्क आरक्षित करता येतील. अमृत उद्यानाला भेट देणाऱ्या सर्वांसाठी प्रवेश राष्ट्रपती भवनाच्या प्रवेशद्वार क्रमांक 35 मधून होईल. अभ्यागतांच्या सोयीसाठी सेंट्रल सेक्रेटरीएट मेट्रो स्टेशन ते प्रवेशद्वार क्रमांक 35 दरम्यान शटल बस सेवा दर 30 मिनिटांनी सकाळी 9.30 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत उपलब्ध असेल.राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यानाव्यतिरिक्त सर्वसामान्य लोक मंगळवार ते रविवार दरम्यान राष्ट्रपती भवनाची मुख्य इमारत आणि राष्ट्रपती भवन संग्रहालयाला देखील आधी तिकीट आरक्षित करून भेट देऊ शकतात. अमृत उद्यान 26 फेब्रुवारी रोजी दिव्यांग व्यक्तींसाठी, तर 27 फेब्रुवारी रोजी संरक्षण, निमलष्करी आणि पोलिस दलातील कर्मचाऱ्यांसाठी, 28 मार्च रोजी महिला आणि आदिवासी महिला बचत गटांसाठी आणि 29 मार्च रोजी ज्येष्ठ नागरिकांसाठी खुले असेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -