Virat Kohli: विराट कोहलीचा चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा निर्णय

मुंबई: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ठीक आधी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीबाबत(Virat Kohli) मोठी बातमी समोर आली आहे. कोहली लवकरच रणजी ट्रॉफी सामन्यात खेळताना दिसणार आहे. दुसरीकडे रोहित शर्माही या स्पर्धेत खेळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. रणजी ट्रॉफीसाठी मुंबई संघाची घोषणा करण्यात आली आहे. यात रोहित शर्माचा समावेश करण्यात आला आहे.


यातच आणखी एक बातमी समोर येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विराट कोहली रणजी ट्रॉफीमध्ये दिल्लीच्या संघाकडून खेळताना दिसणार आहे. सूत्रांच्या मते कोहलीने डीडीसीएला सांगितले की तो रेल्वेविरूद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध असणार आहे. दिल्लीचा संघ रेल्वेविरुद्ध ३० जानेवारीपासून सामना खेळणार आहे. कोहली या सामन्यात खेळताना दिसेल.


कोहली रेल्वेविरुद्ध सामना खेळण्यासाठी उतरल्यानंतर त्याचा १३ वर्षांनी पहिला रणजी सामना असेल. कोहली शेवटचा २०१२मध्ये रणजी सामन्यात खेळला होता. त्याने उत्तर प्रदेशविरुद्ध गाझियाबाद येथे शेवटचा रणजी सामना खेळला होता. दिल्लीचा संघ रणजीमध्ये आपला पुढील सामना २३-२५ जानेवारीदरम्यान सौराष्ट्रविरुद्ध राजकोटमध्ये खेळणार आहे. कोहली हा सामना खेळणार नाही.


विराट कोहलीचा फॉर्म बिघडला


कोहली रेड बॉल फॉरमॅटमध्ये खराब फॉर्मशी झगडत आहे. त्यामुळे त्याला टीकाकारांचाही सामना करावा लागला. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४-२५मध्ये त्याने पर्थमध्ये कसोटी शतक ठोकले. तर ९ डावांमध्ये २३.७५च्या सरासरीने १९० धावा केल्या. तसेच ८ वेळा कॅच आऊट झाला.

Comments
Add Comment

एकदिवसीय मालिकेला ३० नोव्हेंबरपासून सुरुवात, मात्र शुभमन आणि श्रेयस संघातून बाहेर! केएल राहुल होणार संघाचा कॅप्टन ?

मुंबई: येत्या ३० नोव्हेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात एकदिवसीय मालिका सुरू होणार आहे. मात्र एकदिवसीय

पहिल्या दिवसअखेर दक्षिण आफ्रिका ६ बाद २४७

गुवाहाटी (वृत्तसंस्था): गुवाहाटीतील एसीए स्टेडियमवर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट

T20 World Cup 2026: संभाव्य गट जाहीर होण्याआधीच माहिती लीक; भारत–पाकिस्तान पुन्हा एकाच गटात

मुंबई : टी२० विश्वचषक २०२६ ची तयारी जोरात सुरू असून, अधिकृत गटवाटप २५ नोव्हेंबरला जाहीर होणार असले तरी संभाव्य

Smruti Mandhana : स्मृती मंधानाच्या लग्नसराईला भारतीय महिला संघाची हजेरी! सोशल मीडीयावर मज्जा मस्तीचे व्हिडीओ व्हायरल

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना आणि पलाश यांच्या विवाहसोहळ्याची धामधूम सध्या जोरात

कसोटी सामन्यानंतर लगेचच भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका टी-20 मालिका! दक्षिण आफ्रिकेच्या संघात होणार अनेक खेळाडूंचे पुनरागमन

मुंबई: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून गुवाहाटीमध्ये सुरूवात होणार आहे.

टीम इंडियासमोर मालिका वाचवण्याचे आव्हान

गुवाहाटी : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना