मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) १६ जानेवारीला त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरात घुसून चोरट्याने जीवघेणा हल्ला केला होता. त्यानंतर सैफ अली खानला तात्काळ वांद्र्यातील लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सैफवर तात्काळ शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. अशातच आता सैफ अली खानला डिस्चार्ज देण्यात आला आहे. हल्ल्यानंतर पाच दिवसांनी सैफ अली खानला डिस्चार्ज मिळाला आहे. मात्र सैफवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर सैफ आणि करिनाने (Kareena Kapoor) मोठा निर्णय घेतला आहे.
E-Water Taxi : मुंबईच्या समुद्रातून आता ‘ई-वॉटर टॅक्सी’ धावणार!
सैफवर झालेल्या हल्ल्यानंतर खान आणि कपूर कुंटुंबियांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे करिना कपूर आनि संपुर्ण कुटुंबाने राहतं घर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सैफ आणि करिना पुन्हा जुन्या घरात राहायला जाणार असल्याची माहिती आहे. सध्या सैफ अली खानचे सद्गुरू शरण या बिल्डिंगमध्ये ११ व्या आणि १२ व्या मजल्यावर घर आहे. परंतु हे घर सोडून ते पुर्वीच्या घरी म्हणजेच फॉर्च्युन हाइट या बिल्डिंगमध्ये राहायला जाणार आहेत. दरम्यान, यांनी शिफ्टीमग देखील सुरु केले आहे.