Anil Bonde : राहुल गांधी हे 'पप्पू टप्पू उडान टप्पू'- खा. अनिल बोंडे

अमरावती : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची जीभ छाटायला नको तर जिभेला चटके द्यायला पाहिजे असे वादग्रस्त विधान करणारे भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी पुन्हा एकदा राहुल गांधी यांना लक्ष केले आहे. 'पप्पू टप्पू उडान टप्पू' म्हणत बोंडे यांनी त्यांच्यावर जहरी टीका केली आहे.


खासदार डॉ. अनिल बोंडे पत्नी डॉ. वसुधा बोंडे यांच्यासोबत अंदमान निकोबार बेटाच्या दौऱ्यावर आहेत. केंद्र सरकारच्या हिंदी राजभाषा समितीच्या निमित्याने त्यांचा हा दौरा होत आहे. दरम्यान त्यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या सेल्युलर तुरुंगातील काळकोठडीला भेट दिली. ज्या ठिकाणी सावरकरांना काळ्यापाण्याची शिक्षा भोगावी लागली त्या कोठडीत जाऊन अनिल बोंडे यांनी सावरकरांचे स्मरण केले. त्या कोठडीत काही काळ ध्यानही केले. तसेच सावरकरांच्या पावन स्मृतीला आपण नमन करत असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.



दहा वर्षापर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी या कोठडीत वास्तव्य केले. जी माणसे वीर सावरकरांवर टीका करतात, त्यांनी या कोठडीत एकदा येऊन बधावे. सात दिवस राहून पाहावे. इथला कोल्हू चालवावा. तुरुंगातले कपडे घालावे त्यावेळी काँग्रेस आणि समस्त टीकाकारांना सावरकरांचे देशासाठी काय बलिदान होते, त्यांनी देशासाठी काय त्याग केला, हे लक्षात आल्याशिवाय राहणार नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. सोबतच सावरकरांचा त्याग अंदमानात येऊन अनुभवण्याचाही सल्ला डॉ. बोंडे यांनी दिला. असे असतानाच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना माफीवीर म्हणून हिनविणाऱ्या राहुल गांधी यांचा देखील त्यांनी चांगलाच समाचार घेतला.

Comments
Add Comment

MPSC कडून राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2026 साठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; उमेदवारांना मोठा दिलासा

अर्ज आणि शुल्क भरण्यासाठी मिळाली नवी मुदत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व

Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या;सर्वसामान्यांसाठी मोठी घरांची लॉटरी लवकर जाहीर करा - उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

म्हाडाच्या लॉटरीत प्रतिसाद न मिळणाऱ्या घरांची 'फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह' तत्त्वावर विक्री करा;पुणे, शिरूर,

Shetkari Karjmafi update : कर्जमाफी योजनेत १ लाख ४० हजार शेतकरी अपात्र; प्राप्तिकर आणि अन्य कारणांनी वगळल्याची सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

१६ लाख ९६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात दोन दिवसांत निधी जमा होणार मुंबई : राज्य सरकारने घोषित केलेल्या 'पुण्यश्लोक

Tuljabhavani Temple Land Case : तुळजाभवानीच्या १,६६८ हेक्टर जमिनींच्या कथित घोटाळ्यावर समिती आक्रमक; 'तातडीने ताबा घ्या, नाहीतर कोर्टात भेटू!'

पुणे : श्री तुळजाभवानी देवस्थानच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील

Devendra Fadnavis : गतिमान भूसंपादन करून औद्योगिक विकासाला चालना द्यावी

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; मुख्यमंत्र्यांनी घेतला एमआयडीसीअंतर्गत प्रकल्पांच्या भूसंपादनाचा आढावा मुंबई

Road Accident : घाटात मोठा अपघात, ब्रेक फेल झाला आणि ट्रकने SUV चिरडली; तीन वाहनांचे प्रचंड नुकसान

गडचिरोली : कोरची - कुरखेडा राष्ट्रीय महामार्गावर बेडगाव घाटात बुधवारी (५ ऑगस्ट २०२६) सकाळी साडेअकराच्या सुमारास