Monday, May 12, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

Water Scheme : पिंपरी-चिंचवड शहरावर पाणी संकट?

Water Scheme : पिंपरी-चिंचवड शहरावर पाणी संकट?

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराच्या लोकसंख्येत दिवसेंदिवस मोठी भर पडत आहे. वाढत्या शहराची तहान भागविण्यासाठी पाण्याचे नवनवे स्त्रोत शोधण्याची वेळ पालिका प्रशासनावर आली आहे. तसेच राखीव पाणी साठ्याबाबत वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. असे न झाल्यास शहरावर पाणी संकट ओढविण्याची भीती व्यक्त केली जात आहे.



नवीन स्त्रोताचा शोध घेण्याची वेळ


पिंपरी-चिंचवड शहरात राहण्यास मोठी पसंती दिली जात आहे. तसेच लोकसंख्येचा वेग पाहता शहराची लोकसंख्या दहा वर्षात दुप्पट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र काही भागांत पुरेसे पाणी मिळत नसल्याची तसेच, काही हाउसिंग सोसायट्यांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी कायम आहेत. बोअरींग तसेच, खासगी टँकरच्या पाण्यावर अनेक हाऊसिंग सोसायट्यांना आपली गरज भागवत आहेत. पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर, रावेत, किवळे, मामुर्डी, पुनावळे, चर्‍होली, थेरगाव, चिंचवड, मोशी, वाकड, पिंपळे गुरव तसेच, एमआयडीसी भागात टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. लोकवस्ती वाढत असल्याने पाण्याची मागणी वाढत आहे. पाण्याची गरज भागविण्यासाठी महापालिका प्रशासनाला पाण्याचे नवीन स्त्रोताचा शोध घेण्याची वेळ आली आहे.



पाण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा


काही गावे महापालिकेत समाविष्ट होण्याची शक्यता आहे. त्या लोकसंख्येची पाण्याची गरज भागविण्यासाठी आताच नियोजन करणे आवश्यक झाले. त्यानुसार राज्य सरकारकडे आम्ही वेळोवेळी प्रस्ताव दिले आहेत. त्यावर पालिकेकडून पाठपुरावा केला जात आहे. सध्या सुरू असलेली भामा आसखेड पाणी योजनेचे कामे मुदतीत पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे. काही महिन्यात आंद्रा पाणी योजनेचे काम सुरू केले जाईल, असे महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले.

Comments
Add Comment