Sunday, November 2, 2025
Happy Diwali

Mahakumbh : महाकुंभात नऊ कोटी भाविकांनी केले स्नान; अमित शहा २७ जानेवारी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड १ फेब्रुवारी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू १० फेब्रुवारी तर पंतप्रधान नरेंद्र मोदी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हजेरी लावणार

प्रयागराज : उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे गंगा- यमुना या दृश्य व सरस्वती या अदृश्य नद्यांच्या संगमावर आयोजित महाकुंभ मेळाव्यात (Mahakumbh) देश-विदेशातून लाखो भाविक हजेरी लावत आहेत. त्यामुळे इथे येणाऱ्या भाविकांचा आकडा हा दररोज वाढताना दिसून येत आहे. आज १५.९७ लाखांहून अधिक भाविकांनी आणि आतापर्यंत ८.८१ कोटींहून अधिक भाविकांनी प्रयागराजमधील त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केल्याची माहिती उत्तर प्रदेश सरकारने दिली आहे.

कोट्यवधी भाविकांना पवित्र स्नानाचे पुण्य देणारा महाकुंभ मेळा सोमवार १३ जानेवारी रोजी सुरु झाला आहे. जवळपास चाळीस कोटीहून अधिक भाविक या महाकुंभमेळ्यास हजेरी लावतील असा अंदाज प्रशासनाने वर्तवला आहे.

पंतप्रधान फेब्रुवारीत महाकुंभाला भेट देणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाकुंभमेळ्याला भेट देण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा २७ जानेवारी रोजी तर उपराष्ट्रपती जगदीप धनखड १ फेब्रुवारी रोजी कुंभमेळ्याला भेट देणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू १० फेब्रुवारी रोजी महाकुंभमेळ्याला हजेरी लावणार आहेत.

Comments
Add Comment