मुंबई : पालिका प्रशासनाने प्लास्टिक विरोधी मोहीम तीव्र केली असून आज एकाच दिवसात १ हजार १४५ आस्थापनांना भेटी देण्यात आल्या. त्यात २९ प्रकरणांमध्ये मिळून सुमारे ६१.५ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. तर एकूण १ लाख ४५ हजार रुपयांचा दंड देखील वसूल करण्यात आला आहे. प्लास्टिक विरोधी ही मोहीम यापुढे देखील तीव्र गतीने सुरू राहणार आहे. पालिकेतर्फे प्लास्टिक विरोधी मोहीम राबविण्यात येत आहे. यापुढच्या काळात देखील ती वेगाने सुरू राहणार आहे. पालिका पथकाच्या समन्वयातून प्रतिबंधित प्लास्टिक व थर्माकोल वस्तूंवर प्रभावीपणे कारवाई होण्यास मदत होत आहे.
Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर तीन दिवस मेगा ब्लॉक!
पालिकेच्या दुकाने व आस्थापना, अनुज्ञापन आणि बाजार खाते विभागाच्या पथकांनी संपूर्ण मुंबई शहरात प्रतिबंधात्मक प्लास्टिक विरोधातील कारवाई सुरू केली आहे. १ जानेवारी ते दिनांक १९ जानेवारी या कालावधीत ५ हजार ७८३ आस्थापनांना भेटी देण्यात आल्या. त्यात ११८ प्रकरणांमध्ये मिळून सुमारे १६७ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. तर एकूण ६ लाख १० हजार रुपयांचा दंड देखील वसूल करण्यात आला आहे. तर, आज एकाच दिवसात १ हजार १४५ आस्थापनांना भेटी देण्यात आल्या. त्यात २९ प्रकरणांमध्ये मिळून सुमारे ६१.५ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे.
एकूण १ लाख ४५ हजार रुपयांचा दंड देखील वसूल करण्यात आला आहे. शासनाने एकल वापराच्या म्हणजेच सिंगल यूज प्लास्टिक वस्तू उत्पादन, वापर, वाहतूक, वितरण, घाऊक आणि किरकोळ विक्री आणि साठवणूक यावर बंदी घालण्यात आलेली आहे.