मुंबई: भारतीय क्रिकेट संघ आता आपल्या पुढील मिशनच्या अगदी जवळ आला आहे. संघाला घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे. याचा पहिला सामना २२ जानेवारीला कोलकाताच्या इडन गार्डनवर रंगणार आहे. या टी-२० मालिकेत सूर्यकुमार यादव नेतृत्व करत आहे.
कर्णधार म्हणून सूर्याची आपल्या करिअरमधील सहावी द्वीपक्षीय टी-२० मालिका आहे. त्याच्या नेतृत्वात आतापर्यंत जबरदस्त रेकॉर्ड राहिला आहे. सूर्याच्या नेतृत्वात भारतीय संघाला अद्याप एकही पराभव मिळालेला नाही. सोबतच सूर्या इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिकेत पहिल्यांदा नेतृत्व करत आहे.
सूर्यकुमार यादवला पहिल्यांदा नेतृत्व करण्याची संधी २०२३मध्ये मिळाली होती. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर टी-२० मालिकेचे नेतृत्व केले होते. पाच सामन्यांच्या या टी-२० मालिकेत भारतीय संघाने ४-१ अशी बाजी मारली होती. यानंतर सूर्याच्या नेतृत्वात भारतीय संघांचा विजयरथ पुढे चालत राहिला.
ऑस्ट्रेलियानंतर सूर्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका संघाचा दौरा केला. येथे २ सामन्यांची टी-२० मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. यानंतर श्रीलंकेला त्यांच्याच भूमीवर २-० असे हरवले. तर बांगलादेशला ३-० असे क्लीन स्वीप केले.
सूर्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने शेवटची टी-२० मालिका दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नोव्हेंबर २०२४मध्ये खेळली होती. चार सामन्यांच्या या मालिकेत द्वीपक्षीय टी-२० मालिका भारतीय संघाने ३-१ अशी आपल्या नावे केली होती. आता सूर्यासमोर इंग्लंड संघाचे आव्हान आहे.
वादळ, हिमनद्या वितळणे, अवकाळी पावसासारख्या वाढल्या आपत्तीच्या घटना ठाणे (प्रशांत सिनकर) : जगभरात २२ एप्रिल…
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…