Tuesday, May 13, 2025

महामुंबईताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Mumbai Traffic : बीकेसीमधील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर!

Mumbai Traffic : बीकेसीमधील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर!

'या' मार्गावर बदल


मुंबई : वांद्रे कुर्ला संकुल (बीकेसी) परिसरातून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाकडून नव्या उपाययोजना काढण्यात येतात. त्याचप्रमाणे वांद्रे येथील बीकेसी परिसरात वाहतूक कोंडी होण्याच्या वाढत्या तक्रारी पाहता वाहतूक पोलीस अलर्ट मोडवर आले आहे. बीकेसीमधील वाहतूक कोंडी (Mumbai Traffic) रोखण्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.



उपायुक्त (मुख्यालय) समाधान पवार यांनी दिलेल्या आदेशानुसार, बीकेसी परिसरात वाहनांची वर्दळ वाढल्यामुळे वाहतूक कोंडी रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी वाहतुकीत बदल केला आहे. त्याअंतर्गत अव्हेन्यु-३ मार्गावरील वाहनांना वी वर्क गॅप ते कनेक्टर जंक्शन व कनेक्टर जंक्शन ते एनएसई जंक्शनपर्यंत जाण्यास प्रवेश बंदी करण्यात आली आहे. आजपासून ही प्रवेश बंदी सुरु केली असून २० एप्रिलपर्यंत हे आदेश लागू असणार आहेत.


वाहनधारक व नागरिकांची गैरसोय न होण्यासाठी प्रवेश बंद मार्गावरील वाहतूक इतर मार्गावर वळवण्यात आली आहे. अव्हेन्यु-३ मार्गावर जाणारी वाहने अव्हेन्यु-३ मार्ग- वी वर्क गॅप डावे वळण – वी वर्क बिल्डींग मागील बाजू उजवे वळण- कनेक्टर ब्रिज खालून एमएमआरडीए मैदान ( फटाका मैदान) – एनएसई जंक्शन येथून इच्छित स्थळी जातील. (Mumbai Traffic)

Comments
Add Comment