

अक्षय शिंदेचा एन्काउंटर नाही, हत्या; मारेकरी पोलिसांना होणार शिक्षा
मुंबई : बदलापूरच्या शाळेत शिकणाऱ्या चिमुकल्या मुलींवरील लैंगिक शोषण प्रकरणात आरोपी असलेल्या अक्षय शिंदेची हत्या झाली. पोलिसांनी एन्काउंटरचा बनाव ...
कोंबडीची शिकार करण्याच्या उद्देशाने आलेला बिबट्या लोखंडी खुराड्यात शिरला आणि अडकला. बिबट्या खुराड्यात अडकल्याचे बघून आत्माराम कांबळे यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी वन विभागाला कळवले. यानंतर वन विभागाचे पथक घटनास्थळी आले. त्यांनी आवश्यक ती खबरदारी घेऊन बिबट्याला खुराड्यातून बाहेर काढले आणि नैसर्गिक अधिवासात नेऊन सोडले. यासाठी बिबट्या अडकलेल्या लोखंडी तारेच्या खुरड्याला ग्रीन शेड नेट गुंडाळून घेऊन पिंजरा लावण्यात आला. यानंतर लांबून खुराड्याच्या तारा कापून बिबट्याला पिंजऱ्यात घेण्यात आले. नंतर बिबट्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. नंतर बिबट्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात नेऊन सोडले.

दिल्लीत भारतीय लष्कराच्या 'डेअरडेव्हिल्स'चा विश्वविक्रम
नवी दिल्ली : कर्तव्यपथावर प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाची तयारी सुरू आहे. ही तयारी करत असताना भारतीय लष्कराच्या 'डेअरडेव्हिल्स'नी विश्वविक्रमाची नोंद ...
बिबट्याच्या सुटकेची कारवाई वनअधिकारी रत्नागिरी (चिपळूण) गिरिजा देसाई आणि सहाय्यक वनसंरक्षक चिपळूण प्रियांक लगड,वनक्षेत्रपाल रत्नागिरी प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यासाठी रत्नागिरी वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार , वनपाल राजापूर जयराम बावदाणे , वनरक्षक राजापूर विक्रम कुंभार, वनरक्षक जालने आणि रेस्क्यू टीमचे दीपक चव्हाण, दीपक म्हादये, नितेश गुरव, अमित बाणे , निलेश म्हादये आदींसह स्थानिक ग्रामस्थांनी संयुक्तपणे केली.
वन्यजीव नागरी वस्तीत किंवा आसपास आढळले तर वन विभागाचा टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ येथे संपर्क साधावा असे आवाहन वन विभागाच्या वतीने वनअधिकारी गिरिजा देसाई यांनी केले.