संजय रॉयला जन्मठेप, ममता बॅनर्जी नाराज

कोलकाता : आर. जी. कार रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीवर बलात्कार करुन नंतर तिची क्रूरपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणी सियालदह न्यायालयाने आरोपी संजय रॉय याला जन्मठेपेची शिक्षा आणि ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला. भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४ (दुखापतीमुळे मृत्यू), कलम ६६ (बलात्कार) आणि कलम १०३ (१) (हत्या) अंतर्गत संजय रॉय याला दोषी ठरवण्यात आले. न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारला पीडितेच्या कुटुंबाला १७ लाख रुपयांची भरपाई द्या, असेही निर्देश दिले. सत्र न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिर्बन दास यांनी हा निर्णय दिला. हा निर्णय जाहीर होताच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज झाल्या. त्यांनी त्यांची नाराजी जाहीर केली.



आरोपीने केलेले कृत्य बघता त्याला फाशीची शिक्षा व्हायला हवी होती, असे म्हणत ममता बॅनर्जी यांनी त्यांची नाराजी जाहीर केली. पश्चिम बंगालमधील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनीही आरोपीला फाशीची शिक्षा व्हायला हवी होती, असे मत व्यक्त केले. 'भरपाईची रक्कम आमचे दुःख कमी करू शकत नाही. घरातील गमावलेला सदस्य परत येणार नाही, यामुळे भरपाई नको'; अशा शब्दात पीडितेच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.



सीबीआयच्या वकिलाने हा दुर्मिळ गुन्हा असल्यामुळे दोषी आरोपीसाठी फाशीच्या शिक्षेची मागणी केली. ही मागणी फेटाळताना न्यायाधीशांनी गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे हे मान्य केले पण दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचा मुद्दा मान्य केला नाही. सियालदह न्यायालयाने १६२ दिवसांत निर्णय देऊन खटल्याचे कामकाज पूर्ण केले.

प्रशिक्षणार्थी डॉक्टर प्रकरणात कोलकाता उच्च न्यायालयातही एक खटला सुरू आहे. या खटल्याचा निकाल अद्याप आलेला नाही.

नेमके काय घडले होते ?

कोलकाता येथील आर. जी. कार रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीचा मृतदेह ९ ऑगस्ट २०२४ रोजी आढळला होता. या प्रकरणात संजय रॉय याला अटक झाली. हाती आलेल्या पुराव्यांच्या आधारे संजय रॉय विरोधात खटला चालवण्यात आला. अखेर सियालदह न्यायालयाने आरोपी संजय रॉय याला दोषी ठरवून शिक्षा ठोठावली.

 
Comments
Add Comment

२१,०००च्या गुंतवणुकीवर १५ लाख मिळवण्याचा दावा खरा की खोटा?

अर्थमंत्र्यांच्या नावाने 'खोटी' गुंतवणूक योजना! सावध राहण्याचे अर्थ मंत्रालयाचे आवाहन नवी दिल्ली: केंद्रीय

न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे नवे सरन्यायाधीश; २४ नोव्हेंबर रोजी पदभार स्वीकारणार

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांची भारताचे ५३वे सरन्यायाधीश म्हणून

भारताला सागरी रोजगाराचे जागतिक केंद्र बनवणार!

केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी व्यक्त केला इंडिया मेरीटाईम वीकमध्ये विश्वास नवी दिल्ली : केंद्रीय

बिहारला ‘जंगलराज’ पासून वाचवा!

गृहमंत्री शहा आणि नड्डा यांचा बिहारच्या मतदारांना इशारा पाटणा: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे

२६/११ आरोपी 'राणा'चे पाकिस्तान कनेक्शन तपासा!

राष्ट्रीय तपास संस्थेकडूनअमेरिकेकडे विशिष्ट माहितीची मागणी; मोठी चौकशी सुरू नवी दिल्ली: राष्ट्रीय तपास

बिहार निवडणूक 2025 : फिलोदी सट्टा बाजारानं निवडणुकीच्या निकालाविषयी केलं भाकीत

पाटणा : बिहारमध्ये निवडणुकीचं तापमान चढलं असलं तरी सगळ्यांची नजर आता राजस्थानच्या प्रसिद्ध फिलोदी सट्टा