मुंबई: भारताचा स्टार खेळाडू नीरज चोप्रा लग्नबंधनात अडकला आहे. नीरजने रविवारी रात्री सोशल मीडियावर फोटो शेअऱ करत याची माहिती दिली. नीरजच्या लग्नात त्याचे जवळचे नातेवाईक तसेच मित्रमंडळी उपस्थित होते. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरजच्या लग्नाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. अखेर यावर शिक्कामोर्तब झाले आहे. नीरजने आपल्या पत्नीसोबत फोटो शेअर केले आहेत.
नीरजने लग्नाचे फोटो एक्सवर शेअर केलेत. यात त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, आयुष्याच्या नव्या अध्यायाची सुरूवात आपल्या कुटुंबासोबत केलीये. नीरजच्या लग्नात केवळ जवळच्या व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले होते. त्याने कॅप्शनच्या मआध्यमातून आपल्या बायकोचे नावही सांगितले आहे. तिचे नाव हिमानी आहे. ती काय करते याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.
जीवन के नए अध्याय की शुरुआत अपने परिवार के साथ की। 🙏
Grateful for every blessing that brought us to this moment together. Bound by love, happily ever after.
नीरज ♥️ हिमानी pic.twitter.com/OU9RM5w2o8
— Neeraj Chopra (@Neeraj_chopra1) January 19, 2025
नीरजच्या लग्नाची सुरू होती चर्चा
नीरजने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी भालाफेक प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते. त्याचा हा विजय ऐतिहासिक होता. यानंतर नीरजच्या लग्नाची जोरदार चर्चा होती. नीरजला अनेक मुलाखतींमध्ये लग्नाबाबतचे सवाल केले जात असत. मात्र त्याने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. तसेच त्याने होणाऱ्या जोडीदाराबद्दलही खुलासा केला नव्हता. आता गुपचूप लग्न केले आहे.