मुंबई : मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतल्या एका नामांकित हॉटेलमध्ये एका ६० वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला आहे. या घटनेने आजुबाच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Nitesh Rane : सरकारच्या माध्यमातून भजनी कलाकारांना मानधन दिले जाईल – मंत्री नितेश राणे
मुंबई हे शहर गजबजलेल्या शहरांपैकी एक आहे. फिरण्याच्या तसेच उदरनिर्वाह करण्याच्या उद्देशाने अनेक लोक मुंबईत येतात. मुंबईत राहण्यासाठी हजारो नामांकित हॉटेल गरजूंसाठी उपलब्ध असतात. अशाच एका नामांकित हॉटेलच्या रूम मध्ये विसावलेल्या ६० वर्षीय महिलेचा मृतदेह सापडला आहे. मुंबईतील हॉटेल ट्रायडंट मध्ये हा मृतदेह सापडला असून मृत महिलेचं नावं विनती मेहतानी असल्याचं समजत आहे. ही महिला २७ व्या मजल्यावरील या रूम मध्ये ६ जानेवारीपासून एकटीच राहत होती. रूम क्लिनिंग साठी गेलेल्या कर्मचाऱ्याला प्रतिसाद न दिल्याने कर्मचाऱ्याला संशय आला. त्याने मास्टर किने दरवाजा उघडून बघताच आतमध्ये महिलेचा मृतदेह आढळला आहे. रविवारी संध्याकाळी ही घटना घडली असून या महिलेचा मृत्यू नैसर्गिक झाला की तिने स्वतः आत्महत्या केली आहे याबाबत मुंबई पोलीस अधिक तपास करत आहेत.