मुंबई : अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळाने आज माटुंगा येथे आयोजित केलेल्या ‘अखिल भारतीय भजन संमेलन २०२५’ या कार्यक्रमाला राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री नितेश राणे उपस्थित होते.
कोकणात डबलबारी भजनाला मोठी लोकप्रियता आहे. कोकणवासियांनी दिलेल्या पाठिंब्याने आज महायुती सरकार भक्कमपणे उभे आहे. हे सरकार आपल्या हक्काचे सरकार आहे.
Yogesh Mahajan Death : कलाविश्वात शोककळा! अभिनेते योगेश महाजन यांचं निधन
भजनी बुवांना मानधन असेल, भजन भवन असेल आदी प्रश्न सोडवून भजनी कलाकारांना या सरकारच्या माध्यमातून भरभरून दिले जाईल, असे यावेळी बोलताना ते म्हणाले. यावेळी स्वागताध्यक्ष सुप्रसिद्ध भजनकार अध्यक्ष भगवान लोकरे, सचिव प्रमोद हर्याण, पत्रकार कमलेश सुतार, ज्येष्ठ भजनी बुवा विजय परब, रामदास कासले, गोपीनाथ बागवे, श्रीधर मुणगेकर, संतोष कानडे, प्रकाश पारकर यांसहित इतर भजनी बुवा, भजनी कलाकार उपस्थित होते.