मुंबई : किया इंडिया कंपनीने भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो २०२५ मधून नवीन ईव्ही६ सर्वांपुढे आणली. नवीन किया ईव्ही६ चे बुकिंग सुरू झाले आहे.
नवीन किया ईव्ही६ सुरक्षिततेबाबत सातत्याने नवीन मापदंड स्थापन करत आहे, ही कार एडीएएस २.० पॅकेजने सुसज्ज आहे. या पॅकेजमध्ये २७ अतिप्रगत सुरक्षितता व ड्रायव्हर सहाय्य सुविधा आहेत. यापूर्वीच्या ईव्ही6च्या तुलनेत पाच अतिरिक्त एडीएएस २.० सुविधांची भर या कारमध्ये घालण्यात आली आहे. या सुविधा पुढीलप्रमाणे: फ्रण्ट कोलिजन्स अव्हॉयडन्स असिस्ट (एफसीए)- शहर/पादचारी/सायकलस्वार/जंक्शन टर्निंग; फॉरवर्ड कोलिजन अव्हॉयडन्स (एफसीए)- जंक्शन क्रॉसिंग; फॉरवर्ड कोलिजन अव्हॉयडन्स- लेन असिस्ट चेंज (एफसीए) – ऑनकमिंग अँड साइड; फॉरवर्ड कोलिजन अव्हॉयडन्स असिस्ट (एफसीए)- इव्हेजिव स्टीअरिंग आणि लेन फॉलो असिस्ट (एलएफए). या सर्व सुविधा आमच्या ईव्ही9 या फ्लॅगशिप मॉडेलमधील अत्याधुनिक तंत्रज्ञानातून विकसित करण्यात आल्या आहेत. यामध्ये दोन वाहनांमधील धडक टाळण्यासाठी आवश्यक सुरक्षितता सुविधांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत तसेच वाहनाची बांधणी अधिक पक्की करण्यात आली आहे. गाडीत बसलेल्यांच्या सुरक्षिततेची व्यवस्थाही सुधारण्यात आली आहे. वाढीव शक्ती आणि सुधारित एडीएएस पॅकेज यांमुळे तुम्ही ही कार अधिक आत्मविश्वासाने चालवू शकता. ईव्हीसिक्सचे डिझाइन अपघातांपासून वाचवण्याच्या दृष्टीनेच करण्यात आले आहे.
लाँच केलेली नवीन किया ईव्ही६ अत्याधुनिक, आणखी वेगवान, आणखी आरामदायी आणि आणखी सुरक्षित आहे; असे किया इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी ग्वांगु ली म्हणाले. ही पर्यावरणपूरक कार असल्याचे ते म्हणाले. या कारमध्ये स्टार मॅप लायटिंग, फ्रण्ट जीटी-लाइन स्टायलिंग बम्पर, ग्लॉसी फिनिश असलेली १९ इंची मिश्रधातूंची चाके आणि स्टार-मॅप एलईडी रीअर कॉम्बिनेशन लॅम्प्स आदी १५ आधुनिक सोयी आहेत. नवीन ईव्हीसिक्स अधिक दणकट, धारदार आणि या मालिकेतील पूर्वीच्या गाड्यांच्या तुलनेत अधिक गतीशील आहे. हे वाहन किया कनेक्ट २.० तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. त्यामुळे किया कनेक्ट डायग्नोस्टिक्स आणि ओव्हर-द-एअर (ओटीए) सॉफ्टवेअर अपडेट्सचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवाय, डिजिटल की २.० (अल्ट्रा-वाइडबॅण्ड तंत्रज्ञानाने युक्त) तंत्रज्ञानामुळे अनुकूल स्मार्टफोनचे रूपांतर आभासी किल्लीमध्ये होऊ शकते आणि ते अत्यंत सोयीस्कर ठरू शकते.
महत्त्वाची वैशिष्ट्ये : प्रशस्त केबिन, ८४-केडब्ल्यूएच क्षमतेची शक्तिशाली बॅटरी, हॅण्ड्स-ऑन डिटेक्शन तंत्रज्ञानासह डबल डी-कट स्टीअरिंग व्हील, ३२५ पीएस आणि ६०५ एनएम टॉर्क, ३५०-केडब्ल्यू क्षमतेचा वेगवान चार्जर, ३१.२ सेंटीमीटर्सचा पॅनोरॅमिक कर्व्ह्ड डिसप्ले, कनेक्टेड कार नेव्हिगेशन कॉकपिट