मुंबई: सलमान खानचा रिअॅलिटी शो बिग बॉस १८च्या विजेत्याची घोषणा झाली आहे. या वर्षी सर्व स्पर्धकांना मागे टाकत करणवीर मेहराने हा शो जिंकला आहे. तर शोमध्ये विवियन डिसेना रनर अप ठरला. गेल्या काही दिवसांपासून करणवीर मेहराने आपल्या खेळाने लोकांचे मन जिंकले होते. त्याचमुळे तो विजेता ठरला.
करणवीर मेहरा गेल्या काही दिवसांपासून वोटिंग ट्रेंडमध्ये आघाडीवर होता. दरम्यान, विवियन डीसेनाही मतांच्या बाबतीत त्याला चांगली टक्कर दिली. मात्र ट्रॉफी आपल्या नावे करता आली नाही. तर करणचे कुटुंबीय आणि चाहते मात्र सध्या सेलिब्रेशनमध्ये व्यस्त आहेत. या शोमध्ये रनरअप विविय डीसे, तर रजत दलाल तिसऱ्या, अविनाश मिश्रा चौथ्या आणि चुम दरांग पाचव्या स्थानावर होते.
View this post on Instagram
करणने बिग बॉस १८ची ट्रॉफी जिंकण्यासोबतच बक्षिसाची रक्कम म्हणून ५० लाख रूपये मिळवले आहेत. तर विवियन डीसेनालाही खास बक्षिसे मिळाली.
या स्पर्धकांचा शानदार परफॉर्मन्स
स्पर्धेच्या फायनलची संध्याकाळ अतिशय शानदार राहिली. यात सर्व स्पर्धकांनी आपल्या धमाकेदार परफॉर्मन्सने सगळ्यांचे मनोरंजन केले. तर करण, शिल्पा आणि विवियनच्या डान्सनेही प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
Neeraj Chopra: गुपचूप लग्नबंधनात अडकला भारताचा स्टार खेळाडू नीरज चोप्रा, फोटो शेअर करत दिली माहिती
हे ६ स्पर्धक होते फायनलमध्ये
सलमान खानच्या शोमध्ये यावेळेस टॉप ५ नव्हे तर टॉप ६ स्पर्धकांनी जागा मिळवली होती. या यादीत करणवीर मेहराशिवाय विवियन डीसेना, अविनाश मिश्रा, चुम दरांग, इशा सिंह आणि रजत दलाल हे स्पर्धक होते.