

Ajit Pawar : लाडक्या बहीणींसाठी ‘महिला व बाल विकास’कडे ३,७०० कोटींचा चेक जमा
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली माहिती मुंबई : लाडकी बहीण योजना महायुतीला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी महत्त्वाची ठरली होती. नोव्हेंबरमध्ये ...
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर १६ जानेवारी रोजी मध्यरात्री चाकूहल्ला झाला. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी मोहम्मद शरीफुल इस्लाम शेहजाद (Mohammad Shariful Islam Shehzad) या ३० वर्षीय तरुणाला अटक केली आहे. न्यायदंडाधिकाऱ्यांनी मोहम्मदला पाच दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. या कोठडी दरम्यान केलेल्या चौकशीत मोहम्मदकडून मुंबई पोलिसांना नवी माहिती मिळाली आहे.

Amitabh Bacchan : डॉक्टरांच्या आश्वासक हमीमुळेच रूग्णांचा ५० टक्के आजार होतो बरा
बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केली सदिच्छा मुंबई : अनेकदा डॉक्टरांच्या आश्वासक हमीमुळेच रूग्णांचा ५० टक्के आजार बरा होतो. त्यामुळे ...
आर्थिक अडचणी वाढू लागल्यामुळे मोहम्मद नोकरी करत होता. या नोकरी दरम्यान एका रिक्षावाल्याशी गप्पा मारताना मोहम्मदला सेलिब्रेटींच्या घरी दरोडा टाकण्याची कल्पना सुचली. यानंतर मोहम्मदने मुंबईत फिरुन शाहरुख खान, सैफ अली खान यांच्यासह निवडक सेलिब्रेटींच्या घरांची लांबून पाहणी केली होती. कोणत्या घरात कोणत्या मार्गाने प्रवेश करावा याचे नियोजन करण्यासाठी मोहम्मदने वेगवेगळ्या भागांचे फोटो त्याच्या मोबाईलमध्ये काढले होते. ही माहिती मिळताच पोलिसांनी मोहम्मदच्या मोबाईलची तपासणी सुरू केली आहे. गुन्ह्याचे नियोजन, नेमकी घडलेली घटना आणि त्यानंतर ठाण्यात अटक होईपर्यंतचा घटनाक्रम याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी मोहम्मद शरीफुल इस्लाम शेहजाद याची कसून चौकशी सुरू केली आहे.

संजय रॉयला जन्मठेप, ममता बॅनर्जी नाराज
कोलकाता : आर. जी. कार रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीवर बलात्कार करुन नंतर तिची क्रूरपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणी सियालदह न्यायालयाने ...
मोहम्मद भारतात विजय दास (बिजॉय दास) या नावाने वावरत होता. काही दिवस मुंबईत आणि नंतर मुंबई जवळच्या भागात तो वास्तव्यास होता. तो एका हाऊसकिपिंग कंपनीत बनावट कागदपत्रे दाखवून नोकरी करत होता. या नोकरीत असतानाच त्याला गुन्हा करण्याची कल्पना सुचली. सैफच्या घरात दरोडा टाकण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर मोहम्मदने घरातून बाहेर पडून वेगवेगळ्या ठिकाणी फिरत अखेर ठाणे गाठले. या दरम्यान मोहम्मदने वारंवार कपडे बदलले होते. पण पोलिसांनी हाती आलेल्या माहितीच्या मदतीने मोहम्मदला ठाण्याच्या कासारवडवली येथील हिरानंदानी इस्टेटच्या मागे असलेल्या झुडुपातून अटक केली. आरोपी हिरानंदानी इस्टेटमधील टीसीएस कॉल सेंटरच्या मागे असलेल्या मेट्रो बांधकाम स्थळाजवळील कामगार छावणीनजीकच्या झुडुपांमध्ये लपला होता. मोहम्मद ठाण्यातील ‘रिकीज’ बारमध्ये हाऊसकीपिंग कामगार म्हणून काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. याआधी तो एका पबमध्ये काम करत होता.