बीड : पोलीस होण्याची इच्छा असलेल्या प्रत्येक मुलाला तंदुरुस्त राहण्यासाठी सरावाची गरज असते. मुलं दिवसरात्र अंगमेहनत करत असतात. पण बीड मधील पोलीस होऊ पाहणाऱ्या तरुण मुलांचे स्वप्न अपूर्णच राहिले. या मुलांवर काळाने घाला घातला आहे. पोलीस भरतीसाठी तयारी करत असताना ५ तरुणांना लालपरीने चिरडले.
Saif Ali Khan: सैफ अली खानवर चाकू हल्ला करणाऱ्या व्यक्तीला ठाण्यातून अटक
पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या ५ तरुणांना भरधाव वेगातील एसटीने चिरडले. या अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी आहेत. जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बीडच्या घोडका राजुरी फाट्यावरील आज सकाळी साडे सहाच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच संतप्त गावकऱ्यांनी एसटीची तोडफोड करून चालकाला बेदम मारहाण केली. संबंधित चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले. या अपघातामुळे घोडका राजुरी गावावर शोककाळा पसरली आहे.