अमरावती : काल रात्री राज्यभरातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली. नागपूरकर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीचे पालकमंत्रीपद स्वीकारले. तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा विश्वास दाखवित नागपूरचे पालकत्व सोपविले. सोबतच त्यांच्याकडे अमरावतीच्या पालकमंत्रीपदाचीही दुहेरी जबाबदारी देण्यात आली आहे.
दरम्यान, राज्याचे महसूल मंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री पदी नियुक्ती होताच चंद्रशेखर बावनकुळे अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते पश्चिम विदर्भातील पाचही जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त सोबत बैठक घेणार असून पश्चिम विदर्भाचा महसूल विभागाचा आढावा घेणार आहेत.
Guardian Minister यादी जाहीर! नितेश राणेंकडे सिंधुदुर्गचे पालकमंत्रिपद तर मुंडेंना डच्चू