Sunday, August 24, 2025

भारत खो खो विश्वचषकाच्या फायनलमध्ये !

भारत खो खो विश्वचषकाच्या फायनलमध्ये !
नवी दिल्ली : भारताचा महिला आणि पुरुष संघ खो खो विश्वचषकाच्या फायनलमध्ये अर्थात अंतिम फेरीत पोहोचला आहे. भारताच्या महिला आणि पुरुष संघाने खो खो विश्वचषक स्पर्धेतील त्यांचे सर्व सामने जिंकत अंतिम फेरीत धडक मारली. आता रविवार १९ जानेवारी रोजी भारताचा महिला आणि पुरुष संघ खो खो विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात नेपाळच्या महिला आणि पुरुष संघाविरुद्ध खेळणार आहे.
खो खो विश्वचषक २०२५, भारतीय पुरुष संघाची कामगिरी १३ जानेवारी - भारत ४२ विरुद्ध नेपाळ ३७ १४ जानेवारी - भारत ६४ विरुद्ध ब्राझिल ३४ १५ जानेवारी - भारत ७० विरुद्ध पेरू ३८ १६ जानेवारी - भारत ७१ विरुद्ध भूतान ३४ १७ जानेवारी - भारत १०० विरुद्ध श्रीलंका ४० (उपांत्यपूर्व फेरी) १८ जानेवारी - भारत ६० विरुद्ध दक्षिण आफ्रिका १८ (उपांत्य फेरी)
खो खो विश्वचषक २०२५, भारतीय महिला संघाची कामगिरी १४ जानेवारी - भारत १७५ विरुद्ध दक्षिण कोरिया १८ १५ जानेवारी - भारत १०० विरुद्ध इराण १६ १६ जानेवारी - भारत १०० विरुद्ध मलेशिया २० १७ जानेवारी - भारत १०९ विरुद्ध बांग्लादेश १६ (उपांत्यपूर्व फेरी) १८ जानेवारी - भारत ६६ विरुद्ध दक्षिण आफ्रिका १६ (उपांत्य फेरी)
Comments
Add Comment