मुंबई : टाटा मुंबई मॅरेथॉन २०२५ या स्पर्धेत आफ्रिका खंडातील देशांचे वर्चस्व दिसून आले. पुरुष आणि महिलांच्या मुख्य मॅरेथॉनमध्ये अव्वल क्रमांक आफ्रिकेच्या खेळाडूंनीच पटकावले. पुरुष गटातून पहिल्या आलेल्या इरिट्रियाचा बर्हान टेस्फेने दोन तास ११ मिनिटे आणि ४४ सेकांदांची वेळ नोंदवली. तर दुसऱ्या आलेल्या इरिट्रियाच्या मेरहावी केसेतेने दोन तास ११ मिनिटे आणि ५० सेकंदांची वेळ नोंदवली. तिसऱ्या आलेल्या इथिओपियाच्या टेस्फये डेमेकेने दोन तास ११ मिनिटे आणि ५६ सेकंदांची वेळ नोंदवली. भारताचा अनिश थापा स्पर्धेत पुरुष गटात सातवा आणि भारताकडून पहिला आला. त्याने दोन तास १७ मिनिटे आणि २३ सेकंदात स्पर्धा पूर्ण केली. भारताचा मान सिंह पुरुष गटात आठवा आणि भारताकडून दुसरा आला. त्याने दोन तास १७ मिनिटे आणि ३७ सेकंदांत स्पर्धा पूर्ण केली. तर भारताचा गोपी ठोणाकल पुरुष गटात अकरावा आणि भारताकडून तिसरा आला. त्याने दोन तास १९ मिनिटे आणि ५९ सेकंदात स्पर्धा पूर्ण केली.
HSC-SSC Exam Update : वाद झाल्यानंतर हॉलतिकिटांवरून काढून टाकले जातीचे उल्लेख!
मुख्य मॅरेथॉनमध्ये महिला गटात केनियाची जॉयस चेपकेमोई टेली पहिली, बहारीनची शिताये एशेटे दुसरी आणि इथिओपियाची मेडिना डेमे आर्मिनो तिसरी आली. टेलीने दोन तास २४ मिनिटे आणि ५६ सेकंदात, एशेटेने दोन तास २५ मिनिटे आणि २९ सेकंदात तर आर्मिनोने दोन तास २७ मिनिटे आणि ५८ सेकंदात स्पर्धा पूर्ण केली. भारताची निरमाबेन ठाकोर महिला गटात १६ वी आणि भारतीय महिलांमध्ये पहिली आली. ठाकोरने दोन तास ५० मिनिटे आणि सहा सेकंदात स्पर्धा पूर्ण केली. भारताची सोनिका परमार महिला गटात १७ वी आणि भारतीय महिलांमध्ये दुसरी आली. परमारने दोन तास ५० मिनिटे आणि ५५ सेकंदात स्पर्धा पूर्ण केली. तर भारताची सोनम महिला गटात १८ वी आणि भारतीय महिलांमध्ये तिसरी आली. सोनमने दोन तास ५५ मिनिटे आणि ४५ सेकंदात स्पर्धा पूर्ण केली.