Saturday, February 8, 2025
Homeक्रीडाKho Kho World Cup 2025: हु्ssर्रे....महिला संघानंतर भारताच्या पुरुष संघानेही जिंकला खो...

Kho Kho World Cup 2025: हु्ssर्रे….महिला संघानंतर भारताच्या पुरुष संघानेही जिंकला खो खो विश्वचषक २०२५

नवी दिल्ली: खो खो विश्वचषक २०२५मध्ये भारताच्या पुरुष संघाने नेपाळला ५४-३६ असे हरवत पहिल्यांदा वर्ल्ड चॅम्पियनचा खिताब आपल्या नावे केला. महिला संघानंतर पुरुषांच्या संघानेही दमदार कामगिरीच्या जोरावर ग्रुप स्टेजपासून ते फायनलपर्यंत एकही सामना गमावला नाही. फायनल सामन्यात महिलांनंतर पुरुषांनीही नेपाळला पूर्णपणे गुडघे टेकायला भाग पाडले आणि भारताचा झेंडा गर्वाने फडकावला. महिलांनंतर आता प्रतीक वायकरच्या नेतृत्वातील भारतीय पुरूष संघाने या खेळात इतिहास रचला.

भारतीय पुरुष संघ आणि नेपाळचा संघ यांच्यातील फायनल सामन्यातील स्कोरबोर्डवर एक नजर टाकल्यास सुरूवातीपासूनच टीम इंडियाने जोरदार आक्रमण केले होते. नेपाळच्या संघाने पहिल्यांदा टॉस जिंकत पहिल्यांदा बचाव करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांचा डाव त्यांच्यावरच उलटला. पहिल्या टर्नमध्ये प्रतीक आणि टीमने जबरदस्त खेळी करत २६ गुण मिळवले. दुसऱ्या टर्नमध्ये बचाव करण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियाच्या बचावपटूंना नेपाळच्या आक्रमणाने चांगलेच धाववले. नेपाळने दुसऱ्या टर्नमध्ये १८ गुण मिळवले.

Kho Kho World cup 2025: भारताच्या पोरी हुश्शार…भारतीय महिला संघाने जिंकला खो खो विश्वचषक २०२५

तिसऱ्या टर्नमध्ये आक्रमण करताना प्रतीक वायकरच्या टीमने पुन्हा कमाल केली. त्यांनी नेपाळला सामन्यातून बाहेर केले. चौथ्या टर्नमध्ये भारताने बचावात्मक धोरण कायम राखताना नेपाळवर दबाव राखला आणि हा दबाव कायम राखला. अखेरीस हा सामना ५४-३६ असा संपला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -