एक होती मुलगी. तिचं नाव स्वरा. तशी ती हुशार होती, पण जरा धांदरटच! कोणतंही काम सांगितलं की, त्यात गोंधळ घातलाच म्हणून समजा! कुणाचं नीट ऐकून घ्यायचं नाही की, कुठली गोष्ट नीट समजून घ्यायची नाही. मग काम करताना तिची नेहमीच फजिती उडायची!
एके दिवशी स्वरा गेली बाजारात साखर-गूळ आणायला. हातात कापडी पिशवी आणि पैशाचे पाकीट घेऊन! स्वराच्या आईला बरं वाटत नव्हतं म्हणून ती घरीच थांबली होती. स्वरा बाजारात पोहोचली. रस्त्याच्या कडेला अनेक लोक आपल्या भाज्या घेऊन विकायला बसले होते. स्वरा लगेच एका भाजीवाल्याकडे गेली अन् म्हणाली.
अहो काका, अहो काका
लवकर सांगा ना मला
कशी दिली भेंडी, गवार
आणि हिरवीगार पालक, मेथी
भाजीवाला म्हणाला,
अगं स्वरा ऐक जरा
घाई नको, संयम बरा
भेंडी, गवार भाव किलोचा
पालक, मेथी भाव जुडीचा
भाजीवाल्याचे बोलणे ऐकून
स्वरा म्हणाली,
काय बोलता काका तुम्ही
मला काहीच कळत नाही
गवार आणि भेंडीची
जुडी तुम्ही कशी बांधणार!
भाजीवाला खो-खो हसू लागला आणि हसत हसतच म्हणाला,
गवार आणि भेंडीचीच नव्हे
सर्वच फळभाज्या किलोत विकतो
आणि सर्व पालेभाजीची आम्ही जुडी बांधून विक्री करतो.
तरी देखील स्वरा घाईतच म्हणाली,
हो काका समजलं मला
दोन जुड्या भेंडी द्या
तीन जुड्या गवार.
अर्धा किलो मेथी आणि
एक किलो पालक!
भाजीवाला स्वराकडे बघतच राहिला. त्याला कळेना एवढी मोठी मुलगी असून तिला कळत कसं नाही. तिचा चंचलपणा, धांदरटपणा पाहून भाजीवाल्याने स्वतः निर्णय घेऊन स्वराला भाजी दिली. “सगळे मिळून एकशे ऐंशी रुपये झाले” भाजीवाला म्हणाला. पैसे देण्यासाठी स्वराने पिशवीत हात घातला, तर पैशाचं पाकीटच नाही. पिशवी नीट न तपासताच स्वरा धावतच घरी आली आणि आईसमोर पिशवी टाकली. आई म्हणाली, ‘‘काय गं आणलीस का साखर आणि गूळ!” पण आईच्या बोलण्याकडे लक्ष न देता ती पाकीट शोधू लागली. आई म्हणाली, पाकीट शोधते आहेस का? हे बघ पाकीट पिशवीतच आहे!” आईच्या हातून पिशवी अक्षरशः हिसकावून घेत स्वरा भाजीवाल्याकडे पोहोचली. एकशे ऐंशी रुपये देण्याऐवजी त्याला दोनशे ऐंशी रुपये देऊन तिने पुन्हा धांदरटपणा केलाच. पण त्याचं तिला काहीच वाटलं नाही. भाजीने भरलेली पिशवी घेऊन स्वराने घरात पाऊल टाकले आणि आईला म्हणाली,
आई ही घे भाजी
हिरवीगार अन् ताजी
पटापट जेवण बनव
आणि तुझ्या हाताने मला भरव.
आईने स्वराच्या पाठीत एका जोराचा फटका लगावला आणि म्हणाली, “अगं मी तुला बाजारातून साखर आणि गूळ आणायला सांगितला होता तो कुठे आहे? ही भाजी का आणलीस? आई रागाच्या भरात तिला बडबडू लागली. “धांदरट कुठली. एक काम नीट करता येत नाही.” पाच मिनिटे आईची बडबड चालूच होती. पण हे सारे ऐकायला स्वरा घरात होतीच कुठे! ती तर कधीच बाहेर निघून गेली होती!
तेवढ्यात स्वराचा आवाज आला, “आई आता बस कर. नको बडबडू मला. हे घे तू सांगितलेले रवा आणि पोहे आणलेत मी” आता मात्र स्वरापुढे आईला हसावे की रडावे हेच कळत नव्हतं!
मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.…
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…