ढाका : आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या क्रिकेटपटू विरोधात अटक वॉरंट निघाले आहे. बांग्लादेश क्रिकेट संघातील प्रमुख खेळाडू असलेल्या शाकिब अल हसन विरोधात अटक वॉरंट निघाले आहे.
चेक बाऊन्स झाल्यामुळे बँकिंग क्षेत्राशी संबंधित नियमांतर्गत शाकिब अल हसन विरोधात अटक वॉरंट निघाले आहे. न्यायालयाने शाकिब अल हसन विरोधात अटक वॉरंट काढले आहे. क्रिकेटमध्ये उत्तम कारकिर्द असलेल्या शाकिब अल हसनचे वैयक्तिक आयुष्यातले वर्तन अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. ताज्या चेक बाऊन्स प्रकरणामुळे शाकिब अल हसन अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बांगलादेशच्या शाकिब अल हसनने ७१ कसोटी सामन्यात ४,६०९ धावा केल्या आहेत. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पाच शतके आणि ३१ अर्धशतके झळकावली आहेत. कसोटीत एका डावात फलंदाजी करताना शाकीबने २१७ धावा ही वैयक्तिक सर्वात मोठी धावसंख्या उभारली आहे. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये २४७ सामने खेळत ७,५७० धावा केल्या आहेत. यात त्याने केलेल्या नऊ शतकांचा आणि ५६ अर्धशतकांचा समावेश आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये नाबाद १३४ धावा ही शाकीबची सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या आहे. शाकीबने १२९ आंतरराष्ट्रीय टी – ट्वेंटी सामने खेळून २५५१ धावा केल्या आहेत. त्याने टी – ट्वेंटीमध्ये १३ अर्धशतके झळकावली आहेत.
शाकीबने कसोटी क्रिकेटमध्ये २४६, एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३१७ आणि टी – ट्वेंटीमध्ये १४९ बळी घेतले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये शाकीबने १९ वेळा एका डावात पाच बळी घेण्याची किमया केली आहे. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये चार वेळा आणि टी – ट्वेंटीमध्ये दोन वेळा एका डावात पाच बळी घेण्याची किमया केली आहे. शाकीबने दोन आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात दहा बळी घेण्याची किमया साधली आहे.
कोलकाता : वक्फ दुरुस्ती विधेयकावरून पश्चिम बंगालमध्ये उसळलेल्या हिंसाचारावर भाजप नेते आणि सुप्रसिद्धी अभिनेता मिथुन…
नाशकात दुपारी १ ते ४ दरम्यान ट्रॅफिक सिग्नल राहणार बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय! नाशिक :…
नेटकऱ्यांनी केला कमेंट्सचा पाऊस मुंबई: सध्या मराठी कलाविश्वात सई ताम्हणकरच्या ‘आलेच मी’ या लावणीची जोरदार…
बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्याला हक्काचे पाणी मिळवून देण्याचे तसेच गहिनीनाथ गडाला…
निरोगी त्वचा असणे ही सर्वांचीच इच्छा असते. मात्र, निरोगी आणि सुंदर दिसणाऱ्या त्वचेची योग्य काळजी…
पुणे : चितळे प्रकरण ताजे असतानाच पुण्यामध्ये ब्रँडेड कंपन्यांच्या नावे बनावट कपडे विकल्याची माहिती समोर…