
नवी दिल्ली : महिलांना आर्थिक आधार मिळावा यासाठी महायुती सरकारनं (Mahayuti) लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सुरू केली. या योजनेंतर्गत ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न हे वर्षाला अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील २१ ते ६५ वर्ष वयोगटातील महिलाच्या बँक खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. जुलैपासून ते नोव्हेंबरपर्यंतचे पाच हप्ते या योजनेतील लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. दरम्यान आतापर्यंत ही योजना केवळ महाराष्ट्रातील महिलांसाठीच मर्यादित होती. परंतु आता दिल्लीतील महिलांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

बीड : मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येतील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. देशमुख हत्याकांडातील मास्टर माईंड असलेल्या वाल्मिक कराडवर मकोका ...
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी (Delhi Assembly Election) भाजपाने त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात भाजपाने महाराष्ट्राप्रमाणेच दिल्लीतील महिलांनाही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेप्रमाणे दर महिन्याला आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. त्याचबरोबर घरगुती सिलिंडरवर ५०० रुपये सबसिडी देण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (JP Nadda) म्हणाले की, भाजपाचा हा जाहीरनामा दिल्लीच्या विकासाची पायाभरणी करणारा आहे.