Nashik News : पहिल्या पत्नीकडे जास्त राहतो म्हणून दुसऱ्या पत्नीने केली पतीची हत्या

नाशिक : विंचूर गवळी - सैय्यदप्रिंप्री रोडवर पत्नीने भावाच्या मदतीने धारधार शस्त्राने आपल्या पतीचीच हत्या केल्याची घटना घडली आहे. भावसार पवार (४५) असे हत्या झालेल्या इसमाचे नाव आहे. घटना घडल्यानंतर तेथील काही नागरिकांनी जखमीस तातडीने उपचारार्थ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले. हा प्रकार रात्रीच्या सुमारास घडला. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, भावसार पवारचे दोन लग्न झाले होते.



पहिल्या पत्नीकडे भावसार जास्त राहायचा याचा राग दुसरीच्या मनात होता. तसेच तिला मुलबाळ होत नसल्याने दोघांमध्ये नेहमी वाद व्हायचे. या रागातून तिने पतीचा काटा काढायचे ठरवले. काल रात्री तिने भाऊ व इतर २ जण यांच्या मदतीने त्याच्यावर चाकूने वार केले. आडगाव पोलिसांनी याप्रकरणी ५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. आडगाव पोलिसांनी हत्या करणाऱ्या पत्नीला ताब्यात घेतले असून इतर संशयितांचा शोध सुरू आहे.

Comments
Add Comment

डहाणू पारनाका-कुरगाव सागरी महामार्गाचा कायापालट

आता डांबरीकरण नव्हे, 'काँक्रिटीकरण' होणार डहाणू : डहाणू आणि पालघर तालुक्याला जोडणाऱ्या महत्त्वाच्या सागरी

वसई-विरारमधील ७ लाख मतदारांचा कौल कुणाला

महायुती, बहुजन विकास आघाडीत टक्कर विरार (प्रतिनिधी) : वसई-विरार महापालिकेच्या ११५ जागांसाठी गुरुवारी मतदान

२९ महापालिकांत महायुतीचाच महापौर

रवींद्र चव्हाण यांचा ठाम विश्वास कल्याण : कल्याण–डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपचे

कल्याण-डोंबिवलीत ४०.०७ टक्के मतदान

मतदानाचा टक्का घसरला; दुपारी वेग वाढला कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत मतदान प्रक्रियेत

ठाण्यात सुमारे ५५ टक्के मतदान

मतदान यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाडाच्या तक्रारी ठाणे : ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळी ७.३०

मायावतींचा उत्तर प्रदेशात स्वबळाचा नारा

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी गुरुवारी त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा केला.