मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या चाकूहल्ला प्रकरणी एका संशयिताला मध्य प्रदेशमधील एका रेल्वे स्थानकावर ताब्यात घेण्यात आले आहे. रेल्वे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. संशयिताची रेल्वे पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. मुंबई पोलिसांना रेल्वे पोलिसांनी माहिती दिली आहे. लवकरच मुंबई पोलीस संशयिताचा ताबा घेऊन त्याची चौकशी करणार असल्याचे वृत्त आहे. या व्यतिरिक्त छत्तीसगडमध्येही एका संशियाताला ताब्यात घेण्यात आले आहे. पण या संदर्भात अधिक माहिती अद्याप मिळालेली नाही.
सैफ अली खान याच्या वांद्रे येथील घरात मध्यरात्री दरोड्याच्या उद्देशाने घुसखोरी झाली. आवाज ऐकून जागा झालेल्या सैफने दरोडेखोराला विरोध केला. यावेळी झालेल्या संघर्षात दरोडेखोराने चाकूहल्ला केला. या हल्ल्यात सैफ अली खान जखमी झाला. सैफला सहा जखमा झाल्या, यापैकी दोन जखमा गंभीर स्वरुपाच्या होत्या. सैफला जखमी केल्यानंतर चाकूहल्ला करणारा पळून गेला. जखमी झालेल्या सैफला वांद्रे येथील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. तातडीने उपचार झाले, दोन शस्त्रक्रिया झाल्या. यामुळे सैफ अली खान वाचला. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत सैफ अली खान लिलावती रुग्णालयात विश्रांती घेत आहे.
मुंबई पोलिसांनी सैफ अली खान राहतो त्या इमारतीचे सीसीटीव्ही फूटेज तपासले तसेच सैफच्या घरात काम करणाऱ्या नोकरांची चौकशी केली. यानंतर सैफवर हल्ला करणाऱ्याचा शोध सुरू झाला. तपास करणे सोपे व्हावे यासाठी सैफवर हल्ला करणाऱ्याचे सीसीटीव्ही फूटेज पोलिसांनी सार्वजनिक केले. या फूटेजच्या मदतीने शोध सुरू असतानाच मध्य प्रदेशातून एक बातमी आली आहे. स्थानिक रेल्वे पोलिसांनी स्टेशनवरुन एका संशियाताला ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेली व्यक्ती आणि सैफवर हल्ला केल्यानंतर पळून गेलेली व्यक्ती एकच आहे का हे अद्याप समजलेले नाही.
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर १६ जानेवारी रोजी चाकूहल्ला झाला होता. या हल्ल्यात ५४ वर्षीय सैफला सहा जखमा झाल्या होत्या. यापैकी दोन जखमा गंभीर स्वरुपाच्या होत्या. वेळेत लिलावती रुग्णालयात उपचार मिळाल्यामुळे आता सैफची प्रकृती स्थिर आहे.
मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू संजय बांगर सध्या आयपीएल २०२५ मध्ये कॉमेंट्री करत आहे. संजय…
नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank Of India) राज्यातील नियमांचे उल्लंघन करणारे…
मुंबई : प्रभादेवी – कुरणे चौक मार्गावरील बेस्टच्या बस क्रमांक १६७ मधून प्रवास करत असलेल्या…
नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनेक परदेशी दौरे करतात. या दरम्यान ते…
आफ्रिकेच्या सर्वात मोठा तंत्रज्ञान आणि स्टार्टअप शो नवी दिल्ली : गिटेक्स या आफ्रिकेच्या सर्वात मोठ्या…
दिल्लीतल्या गाजलेल्या खटल्यावर आधारित नवीन वेब सिरीज नवी दिल्ली : अभिनेता अली फजल आणि अभिनेत्री…