Saturday, May 10, 2025

ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजरायगड

Mumbai Highway : मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर सुविधा ट्रॅव्हल्सच्या बसला भीषण आग...

Mumbai Highway : मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर सुविधा ट्रॅव्हल्सच्या बसला भीषण आग...

आगीत बस जळून खाक; ३० प्रवाशी बालबाल सुदैवाने बचावले....


लोणावळा : मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आज सुविधा ट्रॅव्हल्सच्या खाजगी बसला भीषण आग लागली असून या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे तर या बस मधील ३० प्रवाशी तात्काळ बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.



मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून मुबंईहुन लोणावळाकडे सुविधा ट्रॅव्हलची बस क्रमांक (MH 47 AS 0779) ही चालक असिफ केनिया (रा दहिसर मुबंई ) ही बस मीरारोड येथून लोणावळाकडे ३० प्रवाशी घेऊन जातं असताना बस बोरघाटात दत्तवाडी जवळ आली असता शॉर्टसर्किटमुळे बसच्या इंजिनला भीषण आग लागली असून या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे,तर चालकाच्या तत्परतेने बस थांबवून प्रवाशी आणि बस मधील सामान बाहेर काढल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. या घटनेची माहिती मिळताच बोरघाट पोलीस, खोपोली नगरपालिका अग्निशमन बंब, आयआरबी अग्निशमन दल, देवदूत यंत्रणा, अपघातग्रस्त टीमचे सदस्य तात्काळ घटनास्थळी दाखल होत आग विझवण्यासाठी शर्थिने प्रयत्न केले...

Comments
Add Comment