High Security Number Plate : वाहनांना ३० मार्चपूर्वी ‘हाय सिक्युरिटी’ नंबर प्लेट अनिवार्य !

ठाणे : बनावट नंबर प्लेट लाऊन होणारे गुन्हे, रस्त्यावर धावणारे वाहन नेमके कोणाचे अशा विविध कारणांमुळे वाहनाच्या नंबर प्लेट वरून वाहनाची खरी ओळख पटविण्यासाठी मोठा अडथळा ठरतो आहे, यावर उकल म्हणून राज्य सरकारने सर्व वाहनांना "हाय सिक्युरिटी नंबर प्लेट" बसविणे अनिवार्य केलं आहे. ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने याबाबत कडक धोरण अवलंबले असून ३० मार्च २०२५ पर्यंत ठाण्यातील सर्व वाहनांच्या नंबर प्लेट या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट असणे बंधनकारक रहाणार आहे.



व्यक्ती इतक्याच वाहनांची संख्या


ठाण्यात व्यक्ती इतक्याच वाहनांची संख्या असल्याचा आभास होतो. रस्त्यावर धावणारे वाहन नेमके कोणाचे हे देखील समजून येत नाही कधी नंबर प्लेट नसणारी किंवा खोट्या नंबर प्लेट लावून वाहने चालवणाऱ्यांची संख्या कमी नाही. मात्र अशा वाहनांचा कळत नकळत एखादा गुन्हा घडला, तर त्याला शोधणे खूप अवघड होऊन जाते. अशा नंबर प्लेट वरून राष्ट्रीय सुरक्षा देखील धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ठण्यसारखी परिस्थिती देशभरात असून याच पार्श्वभूमीवर मा. सर्वोच्च न्यायालयाने सर्व वाहनांना "हाय सिक्युरिटी नंबर प्लेट" लावण्याची सूचना केली आहे. या बाबत राज्य शासनाने सुरक्षेच्या दृष्टीने याची गंभीर दखल घेतली आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयांना आपल्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व वाहनांना ३० मार्च २०२५ पूर्वी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घेण्याचे आवाहन केले असल्याची माहिती ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी दिली.



प्लेट नसणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई


ठाण्यातील १ एप्रिल २०१९ पूर्वी जी वाहने आहेत अशा सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवायची आहे. या कामासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने तीन अधिकृत कंपन्यांची नेमणूक केली आहे. अनधिकृत विक्रेत्याकडून अशी नंबर प्लेट बसवून घेतली तर वाहनाची नोंद केंद्र सरकारच्या डेटाबेस मध्ये होणार नाही. यामुळे १ एप्रिल २०२५ नंतर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट नसणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई होऊ शकते असे ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने सांगितले आहे

Comments
Add Comment

पुणे मेट्रो ‘कॅशलेस’ व्यवहारांमुळे राज्यात अव्वल

पुणे : केंद्र सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला प्राधान्य दिल्याने ‘कॅशलेस’ व्यवहारात

ब्रिटीश पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी यशराज स्टुडिओला दिली भेट

मुंबई : ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर सध्या दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. कीर स्टार्मर यांनी आज,

तोतया ईडी अधिकाऱ्यांचा सुळसुळाट; आता ईडीच्या नोटीसवर क्यूआर कोड

मुंबई : कोणीही तोतय्या ईडी अधिकारी बनून लोकांची आर्थिक फसवणूक करू नये यासाठी ईडीकडून दिल्या जाणाऱ्या सिस्टम

पुण्याला पावसाने झोडपले

पुणे : गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी दुपारी तीनपासून पुन्हा एकदा पुण्याला अक्षरश: झोडपले.

सरकारी रुग्णवाहिका नावालाच, महिलेची भर रस्त्यात प्रसूती

वावी हर्ष येथील घटना; आदिवासींच्या नशिबी नेहमीच वनवास नाशिक : दोन तासापासून कॉल करून रुग्णवाहिका न आल्याने गरोदर

पालिकेच्या २ हजार ७०० कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू होणार

मुंबई : मुंबई महापालिका प्रशासनात ५ मे २००८ पूर्वी भरती झालेल्या २७०० कर्मचाऱ्यांचा जुन्या पेंशन योजनेत समावेश