नवी दिल्ली : भारताचा स्टार क्रिकेटपटू रिंकू सिंग (Rinku Singh) त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सध्या चर्चेत आला आहे. त्याचा उत्तरप्रदेशमधील खासदार प्रिया सरोजसोबत साखरपुडा झाला आहे. समाजवादी पार्टीची सदस्य असलेली प्रिया सरोज (Priya Saroj) दुसऱ्या क्रमांकाची सर्वात तरुण खासदारही आहे.
BCCIच्या खेळाडूंसाठी नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर, पालन केले नाही तर…
अनेक मिडिया रिपोर्ट्सनुसार त्याचा दोन-तीन दिवसांपूर्वीच साखरपूडा झाला आहे. आता लवकरच रिंकू आणि प्रिया हे लग्नबंधनात अडकणार आहेत. प्रिया सरोज ही पेशाने वकीलही आहे. तिने दिल्ली विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. तिने २०२४ ची लोकसभा निवडणूक मछली शहरातून लढवली होती. त्यात तिने भारतीय जनता पक्षाच्या भोलानाथ सरोज यांना पराभूत करत विजय मिळवला होता, त्यावेळी तिचे वय केवळ २५ वर्षे होते. तिचा जन्म २३ नोव्हेंबर १९९८ रोजी झाला आहे. तिला राजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळाले असून तिचे वडील तुफानी सरोज हे उत्तर प्रदेशमधील नावाजलेले नेते आहेत.
दरम्यान, रिंकू सिंग (Rinku Singh) किंवा प्रिया सरोज यांच्यापैकी कोणीही त्यांच्या साखरपूड्याबाबत याबाबत अद्याप त्याने अधिकृत माहिती दिलेली नाही. रिंकू सिंग आता २२ जानेवारीपासून इंग्लंडविरुद्ध सुरू होणाऱ्या टी२० मालिकेत भारताकडून खेळताना दिसणार आहे. त्याची निवड भारतीय संघात झाली आहे. तो भारताच्या टी२० संघातील नियमित खेळाडूंपैकी एक आहे.