वांद्रे : सैफ अलीखान हल्लेच्या प्रकरणानंतर आता वांद्रे परिसरातून धक्क्कादायक अपडेट समोर आली आहे. सैफ अलीखान राहत असलेल्या इमारतीच्या नजीकच्या इमारतीत ५ जानेवारी रोजी दोन अज्ञात चोरांपैकी सुरक्षारक्षकाने एकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले मात्र दुसरा हातातून निसटला असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान पकडलेल्या चोराला पोलिसांनी सोडून दिल्यामुळे त्या चोराने पुन्हा त्याच इमारतीत घुसण्याचा प्रयत्न करत इमारतीच्या सीसीटीव्ही कॅमेरा सोबत छेडछाड केली.
वांद्रे पश्चिमेतील हाय सोसायटी असलेल्या स्कायपर टॉवरमध्ये ५ जानेवारी रोजी दोन अज्ञात चोरांनी शिरकाव केला. चोर शिरल्याचे समजताच सुरक्षारक्षकांनी सावधानगिरी बाळगत हुशारीने एका चोराला पकडलं आणि १०० नंबर वर फोन करत चोराला पोलिसांच्या हवाली केलं मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. पोलिसांनी त्या चोराला सोडून दिले. आणि १२ जानेवारीला परत त्याच दोन चोरांनी त्याच इमारतीत घुसून सीसीटीव्ही कॅमेरा सोबत छेडछाड केली असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर इमारतीच्या मालकाला सुद्धा त्यांनी धमकावलं. दरम्यान वांद्रे परिसर सामान्यांसाठी तरी सुरक्षित आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय.