प्रयागराज : उत्तरप्रदेशच्या प्रयागराज येथे १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी दरम्यान महाकुंभ मेळा आयोजित करण्यात आलाय. त्यानिमित्ताने दररोज कोट्यवधी भाविक त्रिवेणी संगमावर स्नानासाठी येताहेत. परंतु, या परिसरात येते काही दिवस दाट धुके आणि पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. याचा महाकुंभावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
प्रयागराज येथील महाकुंभाच्या चौथ्या दिवशी त्रिवेणी संगमात पवित्र स्नानासाठी ३० लाखांहून अधिक भाविक सहभागी झाले. दरम्यान भारतीय हवामान खात्याच्या अहवालानुसार, उत्तर प्रदेशातील काही भागात मुसळधार पाऊस आणि धुके पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे आणि वादळ येण्याची शक्यताही व्यक्त केली आहे. यामुळे या प्रदेशातील आधीच खराब झालेले हवामान आणखी बिघडेल.
Rinku Singh : स्टार क्रिकेटपटू रिंकू सिंग अडकणार लग्नाच्या बेड्यात!
शनिवार १८ तारखेपासून हवामान आणखी बिघडण्याची शक्यताही आयएमडीकडून वर्तवण्यात आली आहे. यासंदर्भात हवामानतज्ज्ञ सोमा सेन रॉय यांनी सांगितले की, कुंभमेळ्याच्या क्षेत्रात खूप दाट धुके राहण्याची शक्यता आहे. जरी घनता ७० टक्केपेक्षा कमी असली तरी, त्याचा परिणाम तीव्र असू शकतो. त्यामुळे २१ ते २२ जानेवारी दरम्यान उत्तर प्रदेश राज्यातील आग्नेय भागात कुंभमेळा सुरूच राहील, दरम्यान, दाट धुके पडू शकते. तसेच २२ आणि २३ तारखेला पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात हलका पाऊस आणि वादळाची शक्यता आहे, असे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.