मुंबई : राष्ट्रवादीच्या आमदाराची होणार घरवापसी होणार आहे. विधानसभा निवडणुकीआधी अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीत प्रवेश करणारे आमदार सतीश चव्हाण आता पुन्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घरवापसी करत आहेत. विधान परिषदेतील मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण शनिवारी शिर्डीतील मेळाव्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी करणार आहेत. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
आमदार सतीश चव्हाणांची घरवापसी हा शरद पवारांच्या गटाला धक्का असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. सुनील तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार सतीश चव्हाण यांनी १५ ऑक्टोबर २०२४ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुती सरकारच्या विरोधात प्रतिमा मलीन करण्याच्या हेतूने पक्षविरोधी भूमिका घेतली. यामुळे त्यांना सहा महिन्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले. पण सतीश चव्हाण यांनी १३ जानेवारी २०२५ रोजी शरद पवारांच्या नेतृत्वातील पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते शनिवारी शिर्डीतील मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी करत आहेत. सतीश चव्हाण हे २००८ पासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे विधान परिषद सदस्य म्हणून कार्यरत आहेत.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…
ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार मुंबई (प्रतिनिधी) : बनावट पनीर किंवा चीन ऍनालॉग वापरणाऱ्यांवर…
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…