मुंबई : मुंबई महापालिकेकडून सध्या मशिद रेल्वे स्थानक परिसरातील १५४ वर्षे जुन्या कर्नाक पुलाची पुनर्बांधणी सुरु आहे. आतापर्यंत पुलासाठी ५५० मेट्रिक टन वजनाचा, उत्तर बाजूचा गर्डर महापालिकेच्या हद्दीत ९.३० मीटरपर्यंत सरकवण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. मात्र यापुढील कामासाठी प्रशासनाने मध्य रेल्वेकडे उद्या म्हणजेच १८ जानेवारीची मध्यरात्र ते रविवार १९ जानेवारीची पहाटेदरम्यान ब्लॉकची मागणी केली होती. परंतु उद्या मुंबई मॅरेथॉन असल्यामुळे उद्याचा ब्लॉक रद्द करण्यात आला असून तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.
Santosh Deshmukh Murder Case : आंबेजोगाई रोडवरील टोलनाका कि अपहरण केंद्र ??
कर्नाक पुलाच्या पुढील कामकाजासाठी मध्य रेल्वेने २५ जानेवारी मध्यरात्र ते २६ जानेवारी पहाटेपर्यंत सहा तासांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक मंजूर केला आहे. त्यामुळे यादिवशी रात्री उशिरा धावणाऱ्या उपनगरी आणि लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांवर परिणाम होणार आहे.
दरम्यान, कर्नाक पुलाच्या बांधकामामुळे दक्षिण मुंबईतील मशिद परिसर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसर आणि मोहम्मद अली मार्ग परिसरात प्रचंड वाहतूककोंडी निर्माण होत आहे. ही वाहतूक कोंडी लवकरात लवकर दूर करण्याचा महापालिकेचा कल आहे. त्यामुळे दुसरा गर्डर स्थापित करून नवा कर्नाक उड्डाणपूल जून २०२५ पर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याचे मुंबई महापालिकेचे नियोजन आहे.