Svamitva Scheme : स्वामित्व योजना शेतकऱ्यांसाठी कशी ठरणार लाभदायक ?

मुंबई : राज्यात महायुतीचे सरकार येण्याआधी आपल्या जाहीरनाम्यातून अनेक महत्त्वाच्या योजनांची घोषणा केली होती. तसेच विविध घटकांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेणार असल्याचं निवडणुकीपूर्वी महायुतीने म्हटलं होतं. दरम्यान, महायुतीची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना क्रांतिकारक ठरली असून, या योजनेला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळत आहे. तर लेक लाडकी, एसटी प्रवासात महिलांना ५० टक्के सूट, युवा कौशल्य योजना आदी योजना महायुतीने आणल्या आहेत. यानंतर आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची योजना म्हणजे 'स्वामित्व योजना' सरकारने आणली आहे.



स्वामित्व योजना म्हणजे काय?


देशातील कोणत्याही न्यायालयात गेला तरी सर्वाधिक खटले हे मालमत्ते संबंधित आढळतात. गावागावात जमिनीचे वाद नवीन नाहीत. देशात एकही गाव असं आढळणार नाही, जिथं जमिनीवरुन वाद झाला नसेल. कित्येक लोकांची हयात कोर्टात खेटा घालून गेली असेल. ही कटकट आता कायमची संपणार आहे. यासाठी मोदी सरकारने स्वामित्व योजना आणली आहे. या अंतर्गत पंतप्रधान मोदींनी देशातील २३० हून अधिक जिल्ह्यांतील सुमारे ५०,००० गावांमधील मालमत्ताधारकांना स्वामीत्व योजनेंतर्गत ६५ लाखांहून अधिक प्रॉपर्टी कार्डचे वितरण शनिवारी १८ जानेवारी रोजी दुपारी १२:३० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करणार आहेत.



योजनेचे कसा होणार फायदा?


ही योजना जमिनीच्या मालकीचा स्पष्ट पुरावा देते. त्यामुळे जमिनीशी संबंधित वाद कमी होतील. जमिनीची मालकी स्पष्ट झाल्यामुळे ग्रामीण भागातील विकासकामेही जलद गतीने होणार आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांना कर्ज मिळण्याचीही सोय होणार आहे. शेतकरी त्यांच्या जमिनीच्या आधारे सहज कर्ज घेऊ शकतात. अशाप्रकारे ही योजना ग्रामीण भारतातील लोकांचे जीवनमान उंचावण्यास मदत करत आहे.



३.१७ लाखांहून अधिक गावांमध्ये ड्रोन सर्वेक्षण


प्रधानमंत्री स्वामित्व योजनेअंतर्गत आतापर्यंत ३.१७ लाखांहून अधिक गावांमध्ये ड्रोन सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. अशाप्रकारे ज्या गावांना लक्ष्य करण्यात आले त्यापैकी ९२ टक्के गावांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्याच वेळी, १.५३ लाख गावांसाठी सुमारे २.२५ कोटी प्रॉपर्टी कार्ड तयार करण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आपच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आम आदमी पार्टीच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा

देशातील कोणकोणत्या रेल्वेच्या तिकिटांच्या दरांत शुक्रवार २६ डिसेंबरपासून वाढ होणार ?

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने शुक्रवार २६ डिसेंबरपासून देशातील निवडक रेल्वे सेवांच्या दरात वाढ केली

अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! भाविकांसाठी मंदिर बंद... जाणून घ्या सविस्तर

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचे काम संपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी पंतप्रधान

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी

महामार्गावर मोठा अपघात, अवघ्या काही सेकंदात १७ जण होरपळले

चित्रदुर्ग : कर्नाटकमधील चित्रदुर्ग गुरुवारी पहाटे महामार्गावर मोठा अपघात झाला. अवघ्या काही सेकंदात १७ जणांचा