प्रयागराज : ह्यावर्षी महाकुंभ मेळाव्यात लाखो भक्तांची मांदियाळी पाहायला मिळाली. अनेकांनी पवित्र स्नान देखील केलं. या महाकुंभ मेळाव्यात काहीजण चर्चेचा विषयही ठरले आहेत. त्यातील एक हर्षा रिछारिया हे नाव जोरदार चर्चेत आहे. हर्षा रिछारियाला सोशल मीडियावर सर्वात सुंदर साध्वीचा टॅगही देण्यात आला आहे. कुंभमधील ३० वर्षीय हर्षाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, सर्वांना तिच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे. अशातच प्रत्येक लहान-मोठ्या माध्यमांनी तिची मुलाखत घेतली ज्यामध्ये तिने साध्वी होण्याचा निर्णय का घेतला? असे विचारण्यात आलं. या प्रश्नाचं उत्तर देताना तिने ती साध्वी नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
महाकुंभात प्रवेश करताना हीच देखणी साध्वी आराखड्याच्या रथावर बसलेली दिसली. यावरून काहींनी प्रश्न निर्माण केले होते. काही संतांनी हर्षाच्या रथावर बसण्यावर आणि भगवे कपडे परिधान करण्यावर आक्षेप घेतला. हा वाद इतका वाढला आहे की, हर्षा रिछारियाने ढसाढसा रडत महाकुंभ सोडण्याची घोषणा केली आहे.
यही सत्य है
जब जब एक महिला अपने जीवन में कुछ अलग करती है तो समाज के कुछ लोग बढ़ने नहीं देते
बाकी प्रभु इच्छाहर हर महादेव……………..@newscooponline #harsha #viralsadhvi #host_harsha #harshasquad #trending #viralvideo #mahakumbh2025 #prayagraj #sanatan #hindu #mahadev pic.twitter.com/4fYrJYL6Jv
— Harsha (@Host_harsha) January 16, 2025
हर्षाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती ढसाढसा रडताना पाहायला मिळत आहे. त्या व्हिडीओमध्ये ती म्हणाली, ” जी मुलगी या पवित्र कुंभामध्ये धर्माशी जोडून घेण्यासाठी, धर्म जाणून घेण्यासाठी सनातन संस्कृती जाणून घेण्यासाठी इथे आली तिला तुम्ही संपूर्ण कुंभ मेळाव्यात राहण्याच्या स्थितीतही सोडलं नाही. पाप पुण्याचं मला माहित नाही, पण आनंद स्वरूपजींनी जे काही केलं त्याचं पाप त्यांना नक्कीच लागेल. तुम्ही हा पवित्र कुंभ माझ्याकडून हिसकावून घेतला आहे. तो कुंभ जो आपल्या आयुष्यात एकदाच येतो. माझी नेमकी चूक काय आहे?, मला टार्गेट केलं जात आहे. अशा परिस्थितीत, २४ तास या कॉटेजला पाहण्यापेक्षा मी येथून निघून जाणं माझ्यासाठी चांगलं आहे.”