Saturday, May 10, 2025

देशक्रीडाताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

Major Dhyan Chand Khel Ratna Award : क्रीडा विश्वातून आनंदाची बातमी! पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत सर्वोच्च काम करणाऱ्या खेळाडूंना पुरस्कार प्रदान

Major Dhyan Chand Khel Ratna Award : क्रीडा विश्वातून आनंदाची बातमी! पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत सर्वोच्च काम करणाऱ्या खेळाडूंना पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली : भारताच्या क्रीडा क्षेत्रातून कौतुकास्पद बातमी समोर आली आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी कोट्यवधी भारतीयांची मान अभिमानाने उंचावली. भारताची नेमबाज मनू भाकरच्या कौशल्याने मोठा इतिहास रचला आहे. मनू भाकरने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक, तसेच १० मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकारात कांस्यपदक तर एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत २ पदकांची कमाई करणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू ठरली होती. तिच्या या कामगिरीवर भारतवासी खुश होते.



या शानदार कामगिरीनंतर तिला खेलरत्न पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं. दरम्यान शुक्रवारी भारताच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते खेल रत्न पुरस्कार देण्यात आला आहे. तसेच भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंगचाही सन्मान करण्यात आला आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय हॉकी संघाला पदक जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. त्याने या स्पर्धेत सर्वाधिक १० गोल केले होते. त्याच्या या लक्षणीय खेळासाठी त्याला खेल रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.


https://youtube.com/shorts/VCRAG8AEYV4?feature=share

यासह भारताचा पॅरा ॲथलिट प्रवीणने पॅरिस पॅरिलिम्पिक स्पर्धेतील T64 श्रेणीत सुवर्ण पदकाला गवसणी घातली होती. प्रवीणलाही राष्ट्रपतींच्या हस्ते खेल रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.



त्याचबरोबर बुद्धिबळाचा राजा ठरलेल्या डी. गुकेशला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्याच्या या कामगिरीने गुकेशच्या परिवारासह देशाचीही मान अभिमानाने उंचावली आहे.

Comments
Add Comment